Solapur: दोन मुलांना पेटवून आईचीही आत्महत्या

कौटुंबिक वादातून आईने दोन पोटच्या मुलांना पेटवून आत्महत्या केल्याची घटना सोलापूरमध्ये घडली आहे.
Solapur: दोन मुलांना पेटवून आईचीही आत्महत्या
Solapur: दोन मुलांना पेटवून आईचीही आत्महत्याSaam Tv
Published On

सोलापूर: कौटुंबिक वादातून आईने दोन पोटच्या मुलांना पेटवून आत्महत्या केल्याची घटना सोलापूरमध्ये घडली आहे. यात तिघांचाही मृत्यू झाला आहे. आईचे नाव दीक्षा आणि मुलीचे नाव सिंचा, तर मुलाचे धनंजय अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. कलबुर्गीमध्ये आज ही घटना घडली आहे.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, कलबुर्गीमधील स्टेशन बझार परिसरात राहणाऱ्या दीक्षा यांचे कौटुंबिक वाद सुरु होते. यातून तिने मुलगी सिंचा (वय 2), मुलगा धनंजय (वय 3) या दोघांना रॉकेल ओतून पेटवून दिलं आहे. जीवाच्या आकांताने ही मुले ओरडत होती मात्र, तिने दोघांनाही बांधून ठेवलं होते. यानंतर तिने स्वतःही स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले आहे. यात तिघांचाही मृत्यू झाला आहे. याप्रकरणी स्टेशन बझार पोलीस स्टेशनमध्ये घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com