Solapur News: कोथिंबीरचे भाव गडगडले; शेतकऱ्यांनी जुड्या फेकल्या रस्त्यावर

Solapur News: कोथिंबिरीला सोलापुरात कवडीमोल भाव मिळाल्यामुळे आणि व्यापारी खरेदी करायलाही तयार नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कोथिंबीर चक्क रस्त्यावरच फेकून दिल्या आहेत
Solapur News
Solapur NewsSaam tv
Published On

Solapur News: एकीकडे भाज्यांपाठोपाठ धान्यांचे भाव गगनाला भिडले आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांची आर्थिक गणित घालून मोठ्या कष्टाने पिकविलेल्या कोथिंबिरीचा भाव पार कोसळल्यामुळे शेतकऱ्यांचा पुरता हिरमोड झाला आहे. दूर अंतरावरून वाहतूक खर्च करून आणलेल्या कोथिंबिरीला सोलापुरात कवडीमोल भाव मिळाल्यामुळे आणि व्यापारी खरेदी करायलाही तयार नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी कोथिंबीर चक्क रस्त्यावरच फेकून दिल्या आहेत. (Latest Marathi News)

सोलापुरात कोथिंबीर आसपासच्या मंडळींनी जनावरांना चारण्यासाठी आणि किरकोळ बाजारात विकण्यासाठी उचलून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. एक कॅरेट कोथिंबिरीला दहा रूपयेसुध्दा भाव मिळत नसल्यामुळे बीड जिल्ह्यातून आलेल्या तीन शेतकऱ्यांना सुमारे १६० कॅरेट कोथिंबीर रस्त्यावरच फेकून द्यावी लागली.

लागवडीचा खर्च सोडाच,पण साधा वाहतुकीचाही खर्च निघत नसल्यामुळे संतप्त आणि वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांवर कोथिंबीर फेकून देण्याची वेळ आली आहे.

Solapur News
Maharashtra Rain Update: राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता; कोकण विभागासह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात 'यलो अलर्ट' जारी

सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये कोथिंबीर विकण्यासाठी बीड जिल्ह्यातून दीपक गहिनीनाथ ढाक आणि अन्य दोन शेतकऱ्यांनी दोनशे कॅरेट कोथिंबीर आणली होती. परंतु प्रतिकॅरेट अवघा दहा रूपये मिळाला.या कवडीमोल भावाने जवळपास ४०-५० कॅरेट कोथिंबीर कशीबशी विकण्यात आली.

Solapur News
Nashik News: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; १५ लाखांची लाच घेताना तहसीलदार रंगेहाथ अटक

उर्वरीत १६० कॅरेट कोथिंबीर खरेदी करायला व्यापारी तयार नव्हते. तेव्हा शेतकरी अक्षरशः हतबल झाले. किमान लागवडीचा खर्च तर सोडाच,पण वाहतुकीचाही खर्च निघत नाही. उलट पदरचे पैसे देण्याची वेळ आल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी वाहनातून कोथिंबीर उतरविलीही नाही. तर संपूर्ण कोथिंबीर तेथेच रस्त्यावर फेकून दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com