औसात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सोशल मीडिया वॉर पेटलं

कालच आमदार अभिमन्यू पवार हे औसा आणि निलंगा तालुक्यातील 110 शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीन दिवसांच्या कृषी अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत.
औसात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सोशल मीडिया वॉर पेटलं
औसात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सोशल मीडिया वॉर पेटलंदीपक क्षीरसागर
Published On

लातूर - जिल्ह्यातील औसा नगरपालिका ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या NCP ताब्यात आहे तर आमदार हे भाजपचे BJP असून आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपत सध्याला सोशल मीडियावर Social Media जोरदार वॉर सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. औसा शहरातील नागरिकांसाठी आमदार चषक निबंध स्पर्धा- माझे औसा व्हीजन 2031 माझे निबंध या विषयावर सोशल मीडियावर वॉर सुरू झाले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी भाजपाचे आमदार अभिमन्यू पवार यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जनतेसाठी जाहीर केलेला माझा संकल्प याची जाणीव करून दिली आहे.

हे देखील पहा -

जनतेला कोणती आश्वासने दिली होती त्यापैकी कोणतेही आश्वासन आमदार म्हणून निवडून आल्यापासून दोन वर्षे कालावधी पूर्ण झाली तरी पूर्ण केली नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे केंद्रात एकहाती सत्ता असून औसा शहराच्या विकासासाठी कोणतीही योजना अथवा निधी उपलब्ध करून दिली नाही असा आरोप केला असून या स्पर्धेत प्रथम पारितोषिक किंवा उत्तेजनार्थ बक्षीस द्यावे अशी मागणी केली आहे.

औसात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सोशल मीडिया वॉर पेटलं
महिला बौद्ध भिक्खूचा अनैतिक संबंधातून खून!

आता आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार अभिमन्यू पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. कालच आमदार अभिमन्यू पवार हे औसा आणि निलंगा तालुक्यातील 110 शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीन दिवसांच्या कृषी अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी सुरू केलेल्या सोशल मीडिया वॉरला नेमके काय उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com