स्लॅब कोसळून 2 कामगारांचा मृत्यू; 5 कामगारांना गंभीर दुखापत

तालुक्यामधील तानसा फाॅर्म (मेट) या ठिकाणी असलेल्या, औषधे बनवणाऱ्या पेलटेक हेल्थ या कंपनीमध्ये दुपारच्या सुमारास इमारतीचा स्लॅब भरत असताना, स्लॅब कोसळून झालेल्या अपघातामध्ये २ कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे.
स्लॅब कोसळून 2 कामगारांचा मृत्यू; 5 कामगारांना गंभीर दुखापत
स्लॅब कोसळून 2 कामगारांचा मृत्यू; 5 कामगारांना गंभीर दुखापत Saam Tv
Published On

वाडा : तालुक्यामधील तानसा Tansa फाॅर्म (मेट) या ठिकाणी असलेल्या, औषधे बनवणाऱ्या पेलटेक हेल्थ Peltech Health या कंपनीमध्ये दुपारच्या सुमारास इमारतीचा स्लॅब भरत असताना, स्लॅब कोसळून झालेल्या अपघातामध्ये २ कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ५ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खुपरी Khupari याठिकाणी कल्याणी रुग्णालयात hospital उपचार सुरू आहेत. कंपनीच्या हलगर्जीपणाने हा अपघात झाला असल्याचे आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे.

हे देखील पहा-

कमल मंगल खंदारे (वय- ४७) आणि लाल (वय- ३०) हे २ कामगार मृत्युमुखी पडले आहेत. ब्रिजेश पटेल, राकेश कुमार, विजय सिंग, गोरख कुमार आणि अनिल कुमार अशी जखमी झालेल्या कामगारांची नावे आहेत. आलेल्या माहितीनुसार, तालुक्यामधील तानसा फाॅर्म (मेट) या गावाच्या हद्दीमध्ये पेलटेक हेल्थ ही कंपनी आहे. या कंपनी मध्ये औषधांचे उत्पादन केले जाते. या कंपनी मधील एका शेडमध्ये बांधकाम करण्याचे काम सुरू आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास स्लॅब टाकण्याचे याठिकाणी काम सुरू होते.

स्लॅब कोसळून 2 कामगारांचा मृत्यू; 5 कामगारांना गंभीर दुखापत
उल्हासनगरात पुन्हा कोसळला इमारतीचा स्लॅब !

अचानक स्लॅब कोसळून कामगारांच्या अंगावर पडले आहे. यामध्ये कमल आणि लाल या कामगारांना गंभीर दुखापती झाल्याने, त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अन्य ५ कामगार जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खुपरी याठिकाणी कल्याणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, कंपनीच्या हलगर्जीपणाने हा अपघात झाला आहे. मयत कामगारांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमान संघटनेचे नेते जितेश पाटील यांनी यावेळी केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com