Buldhana News: मृत्यूशी झुंज ठरली अपयशी! खेळता खेळता उकळत्या दुधाच्या कढईत पडली, चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू

Buldhana Girl Death: या चिमुकलीची तब्बल तीन आठवड्यांची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली आहे.
Buldhana Girl Death
Buldhana Girl DeathSaam Tv News

Buldhana Latest News: बुलडाण्यामध्ये (Buldhana) उकळत्या दुधाच्या कढईमध्ये पडून सहा वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली होती. या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या चिमुकलीची तब्बल तीन आठवड्यांची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली आहे. तिच्या मृत्यूमुळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे बुलडाण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Buldhana Girl Death
Jalgaon News: आनंदी घरात अवघ्या क्षणात शोककळा; नाचताना भोवळ आली अन्‌..

बुलडाण्याच्या हनुमान चौकातील हनुमान दूध डेअरीचे संचालक युवराज जाधव नांदुरा रस्त्यावरील जाधववाडीत आपल्या कुटुंबीयांसोबत राहतात. 27 एप्रिल रोजी त्यांनी घराच्या आवारात व्यावसायानूरुप दैनंदिनीप्रमाणे मोठ्या कढईमध्ये दूध उकळण्यासाठी ठेवले होते. त्याचठिकाणी युवराज जाधव यांची सहा वर्षांची मुलगी ओमश्री इतर मुलांसोबत खेळत होती. खेळता खेळता ओमश्री उकळत्या दुधाच्या कढईमध्ये पडली.

Buldhana Girl Death
Pune News: आता कैदी करु शकतील कुटूंबियांना व्हिडिओ कॉल; येरवडा कारागृहातून होणार सुरूवात

ओमश्री कढईत पडल्याचे लक्षात येताच तिच्या कुटुंबीयांनी तिला कढईतून तात्काळ बाहेर काढले. गंभीर जखमी झालेल्या ओमश्रीला कोलते हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवले. पण प्राथमिक उपचारानंतर तिला जळगावला उपचारासाठी हलवण्यात आले. तिथे उपचार केल्यानंतर तिला मुंबईला उपचारासाठी हलवले. ओमश्रीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. ती लवकर बरी होईल असे तिच्या कुटुंबीयांना वाटत होते.

पण बुधवारी पहाचे उपचारादरम्यान ओमश्रीने जगाचा निरोप घेतला. तब्बल तीन आठवड्यांनंतर ओमश्रीची मृत्यूंची झुंज अपयशी ठरली. चिमुकल्या ओमश्रीचा मृत्यू झाल्यामुळे तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. गुरुवारी सकाळी मौजे वाघुड येथील जाधव फार्मवर ओमश्रीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com