सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावर साळीस्ते-बौद्धवाडी ग्रामस्थांचा रास्ता-रोको

मुंबई-गोवा महामार्गावर साळीस्ते येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा!
सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावर साळीस्ते-बौद्धवाडी ग्रामस्थांचा रास्ता-रोको
सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावर साळीस्ते-बौद्धवाडी ग्रामस्थांचा रास्ता-रोकोSaamTvNews
Published On

सिंधुदुर्ग : साळीस्ते बौद्ध विकास मंडळ ग्रामस्थ यांच्या वतीने मुंबई-गोवा महामार्गावर असणाऱ्या साळीस्ते बौद्धवाडी येथे रास्ता-रोको आंदोलन करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र-66 लगत साळीस्ते बौद्धवाडी हे शासनमान्य बस स्थानक आहे.

हे देखील पहा :

राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण करताना सदर बसस्थानक संबंधित ठेकेदाराने तोडले व स्थानिक लोकांना सांगितले की चौपदरीकरण रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावर शासनाच्या नियमानुसार बसस्थानक बांधून देण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे. गावात दोन बसथांबे असताना त्यातील एक बसथांबा ठेकेदार व्यवस्थितपणे बांधून देतो.

सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावर साळीस्ते-बौद्धवाडी ग्रामस्थांचा रास्ता-रोको
मराठी अभिनेत्र्या ओठावरची लिपस्टिक पुसत का म्हणतायत #BanLipstick ?

मात्र, एकूण हायवे संलग्न असणाऱ्या पाच वाडीसाठी अत्यावश्यक असणारा बौद्धवाडी एसटी बसथांबा पुनर्बांधणी का करू शकत नाही? असा सवाल रास्ता-रोको करणाऱ्या साळीस्ते गावच्या आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच येत्या 15 दिवसात बसथांबा न बांधल्यास रस्त्यावर उतरून जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा साळीस्ते बौद्ध विकास मंडळ, ग्रामस्थ साळीस्ते यांच्या वतीने देण्यात आला होता.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com