सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीआधीच भाजपला धक्का, नितेश राणेंचा मतदानाचा हक्क सहकार विभागाने नाकारला

सहकार विभागाने आमदार नितेश राणेंचा मतदानाचा अधिकार नाकारला आहे.
नितेश राणेंचा मतदानाचा हक्क सहकार विभागाने नाकारला
नितेश राणेंचा मतदानाचा हक्क सहकार विभागाने नाकारला Saam Tv

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक होत असून ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष मोर्चेबांधणी केलीये. भाजपाने देखील या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी केली. परंतु या निवडणुकी आधीच भाजप पक्षाला मोठा धक्का बसला आहे. (Sindhudurg District Bank Elections Nitesh Rane's right to vote denied by the department of co-operation)

आमदार नितेश राणे (Nitesh Rane) ज्या संस्थेचे सदस्य आहेत. त्या सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाने जिल्हा बँकेकडून कर्ज रुपी घेतलेले 16 कोटी रुपये थकीत असल्याने सहकार विभागाने आमदार नितेश राणेंचा मतदानाचा अधिकार नाकारला आहे.

हेही वाचा -

नितेश राणेंचा मतदानाचा हक्क सहकार विभागाने नाकारला
नितेश राणे कुठे आहेत ते मला माहित, पण मी का सांगू?- नारायण राणे

भाजपकडून जिल्हा बँकेसाठी उमेदवार म्हणून आमदार नितेश राणेंचे नाव चर्चेत होते. मात्र, नितेश राणेंचा मतदानाचा हक्क नाकारला गेल्याने राणेंना आणि भाजपाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com