१४०० कोटी मंजूर झालेत; अजित पवारांचा काेकणवासियांना दिलासा

राज्यपाल राज्यकर्त्यांच्यावरचे प्रमुख असतात त्यांनी पण केलं पाहिजे.
ajit pawar held meeting at sindhudurg oras
ajit pawar held meeting at sindhudurg oras
Published On

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांना देण्यासाठी आपल्याकडे चौदाशे कोटी रुपये बाकी होते. पुरवणी मागण्यांमध्ये चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. राज्यात नैसर्गिक संकट आलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात पैसे देणे बाकी होते. आता चौदाशे कोटी मंजूर झाल्यामुळे सगळे प्रश्न निकाली निघालेले आहे आहेत असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे स्पष्ट केले.

जिल्हा नियोजन समिती आढावा बैठक आज (रविवार) ओरोस (sindhudurg) येथे झाली. या बैठकीस केंदीय मंत्री नारायण राणे (narayan rane), खासदार विनायक राऊत (vinayak raut), उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar), उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (uday samant), गृह राज्यमंत्री सतेज पाटील (satej patil) , आमदार दीपक केसरकर, आमदार नितेश राणे (nitesh rane), आमदार वैभव नाईक (vaibhav naik) आणि जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी (k manjulaxmi) उपस्थित होते.

या बैठकीनंतर (ajit pawar held meeting at sindhudurg oras) माध्यमांशी बाेलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले वर्षाचे आता तीनच महिने बाकी आहेत. त्याच्यामुळे मी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांना दिलेला निधी किती टक्के खर्च झाला आहे, किती टक्के खर्च बाकी व्हायचा आहे. प्रशासकीय मान्यता मिळाल्यास राहिलेले पैसे खर्च करु शकतील का? या आढावा घेत आहे. ते पैसे खर्च करत असताना आमदार निधी, डोंगरी विकास निधीचा पैसा जिल्‍ह्याच्‍या विकास कामाच्या करता उपयोगी ठरतात. त्याच्यावर त्या पद्धतीने त्यांनी ते पैसे खर्च करावेत अशी आमची त्याच्या पाठीमागे साधारण धारणा आहे.

ओमायक्रोन वाढताेय

आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर त्यासाठी आलो. राज्यात ओमायक्रोन या नवीन विषाणूचं प्रमाण वाढत आहे. पंतप्रधानांनी (narendra modi) 15 ते 18 वयोगटातील मुलांना लसीकरण करण्याची घोषणा केली. तसेच साठ वर्षाच्या वरील नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्याने बूस्टर डोस घेण्याचा बद्दलचा त्यांनी सूतोवाच केले आहे. यात फ्रंट वर्कर फिल्डवर काम करतात त्यांच्या करता देखील बूस्टर डोस देण्याबाबत बद्दलचा निर्णय झालेला आहे. त्याच्याबद्दल आपली तयारी व्यवस्थितपणे आहे. उद्या काही घडू नये पण घडलं तर ऑक्सिजनची निर्मितीच्या बद्दल मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की तुम्हाला जेवढा ऑक्सिजन लागेल त्याच्या तिप्पट तुमची तयारी ठेवा. त्या सगळ्या बाबींचा आढावा घेण्याकरता आजची बैठक होती.

ajit pawar held meeting at sindhudurg oras
नाद खूळा! महिला पोलिस कॉन्स्टेबलने केले अजित पवारांचे सारथ्य

चौदाशे कोटी मंजूर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांना देण्यासाठी आपल्याकडे चौदाशे कोटी रुपये बाकी होते. पुरवणी मागण्यांमध्ये चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. राज्यात नैसर्गिक संकट आलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात पैसे देणे बाकी होता तो आता चौदाशे कोटी मंजूर झाल्यामुळे सगळे प्रश्न निकाली निघालेले आहे आहेत.

मुंबईत जाताच निधी देईन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्याच्या बद्दल आता चिपी विमानतळावरून इकडे येताना त्या रस्त्याच्या बद्दल आमदार वैभव नाईक पाठपुरावा करत होते. त्या रस्त्याची वर्कऑर्डर निघाली आहे. आता अभियंता अधीक्षकांनी सांगितलं चिपी रस्त्यासाठी (तीन किलोमीटर रस्त्यासाठी) निधी कमी पडत आहे. तीन किलोमीटर असला तरी मी उद्याच मुंबईमध्ये जाऊन त्याला मंजुरी देऊन तेवढा निधी उपलब्ध करतो असे स्पष्ट केले आहे. तो सगळा रस्ता आता विमानतळ सुरू झाला तर चांगल्या पद्धतीने होईल. काही लोकप्रतिनिधींची मागणी वाहन खरेदीसाठी होती ती पूर्णत्वाला करण्यासाठी त्या बाबतीमध्ये दीपक केसरकर यांनी प्रश्न उपस्थित केले. पाठी मागच्या काळात झालेल्या कामाच्याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. आणि यामधली काम आता नवीन कुठली घेण्यात येऊ नये तर ह्यांच्याही ऐवजी दुसरा काही पर्याय त्याच्यामध्ये आहे का? दुसऱ्या कशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं बद्दल देखील त्या ठिकाणी घेता येतील. याबाबत विचार करून निधी देण्याचे काम आम्ही त्या ठिकाणी करू.

निधी वेगळ्या मार्गांनी देईन

सिंधुरत्न ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या करता सगळ्या लोकप्रतिनिधींचा आग्रह करून घेतलेली योजना आहे. त्याला पण त्याबद्दलचा प्रश्न निर्माण झाला आहे. मी आत्ताच बोललो, चीफ सेक्रेटरी प्लॅनिंग सेक्रेटरी होते. पण आता चीफ सेक्रेटरी आणि मी मुंबई मध्ये गेल्यानंतर मी त्यांना सांगून हा आपला प्रश्न सोडून देईन. मागच्या वेळेस ४२ कोटी रुपये परत गेले ते पण वेगळ्या मार्गांनी देण्याच्या बद्दल प्रयत्न करू असे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.

सर्वस्वी अधिकार राज्यपालांना

विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणुकीसंदर्भात उपमुख्यमंत्री म्हणाले राज्यपालांना प्रस्ताव पाठवला आहे. कुठल्या फाईलवर सही करायची हा सर्वस्वी अधिकार महामहीम राज्यपालांना असतो. लोकशाहीमध्ये ज्या परंपरा चालत आलेल्या आहेत. त्या परंपरांच पालन राज्यकर्ते करतील. राज्यपाल राज्यकर्त्यांच्यावरचे प्रमुख असतात त्यांनी पण केलं पाहिजे.

राजकीय संघर्ष

शिवसेनेच्या चंद्रकांत पाटीलांनी एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे यावर उपमुख्यमंत्र्यांनी मुद्दा खाेडत माझ्या माहितीप्रमाणे अपक्ष निवडून आलेले आमदार आहे ते. तिथं भाजप शिवसेनेची युती होती. ते वेगळे उमेदवार भाजपचे होते, ती जागा भाजपकडे होती. ते शिवसेनेचे आमदार नाहीत. अपक्ष आमदार आहेत. कुठल्याही पक्षाचे आमदार असते तर त्यांनी तशा पद्धतीने आरोप केलेले आहेत. त्या दोघांचं एकमेकांच्या विरोधात राजकीय संघर्ष तुम्हाला ही माहिती आहे.

आपण सिंधुदुर्गमधले आहात, राजकीय संघर्ष असल्यानंतर कशा पद्धतीने आरोप-प्रत्यारोप होतात, हे मी तुम्हाला सांगायचे नवीन गोष्ट नाही. कायदा सुव्यवस्था हाताळताणे पोलिस विभागाचे काम असतं. पोलीस विभाग काम करेल. परंतु पहिल्यांदा काय नक्की झाले ते उद्या सभागृहात आले तर मी विचारेन. आमचे दिलीप वळसे पाटील पण विचारतील. त्या संदर्भातले जे काही त्यांचं म्हणणं आहे असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी नमूद केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com