"त्या" भावा-बहिणीने केले रक्षाबंधनाचे शतक पूर्ण

आज त्यांनी 101 वा रक्षाबंधन साजरा केला आहे.
"त्या" भावा-बहिणीने केले रक्षाबंधनाचे शतक पूर्ण
"त्या" भावा-बहिणीने केले रक्षाबंधनाचे शतक पूर्णSaam Tv
Published On

बारामती - पुरंदर तालुक्यातील परिंचे सटलवाडी येथील भावा-बहिणीने रक्षाबंधनाचे शतक पूर्ण केले आहे. आज त्यांनी 101 वा रक्षाबंधन साजरा केला आहे. पुरंदर तालुक्यातील परिंचे नजीक सटलवाडी येथील गजानन गणपत कदम (वय 102) व अनुसया ज्ञानोबा गायकवाड (वय 104) राहणार कासुर्डी तालुका दौंड आजही उत्साहात रक्षाबंधन साजरे करताना दिसत आहे.

अनुसया ह्या गजानन यांच्या पेक्षा दोन वर्षांनी मोठ्या आहेत. जन्मानंतर तीन वर्षाच्या असल्यापासून त्या गजानन यांच्या हातावर राखी बांधत आहेत. अनुसया यांचा विवाह झाल्या नंतरही रक्षाबंधनाचा दिवस त्या चुकवत नाहीत. पूर्वी वाहतुकीची सोय नव्हती तरी गजानन सायकलवरून बहिणीकडे राखी बांधण्यासाठी जात होते.

हे देखील पहा -

तसेच गजानन यांना वेळ नसल्यास अनुसयाबाई ह्या चालत येऊन राखी बांधत होत्या. हे दोघे भाऊ बहीण नियमित ज्ञानेश्वरी वाचन व हरिपाठ करीत करतात. त्यांनी अनेक वर्षे पायी वारी देखील केली आहे. दोघे भाऊ बहीण यांना शेतीची आवड असल्याने त्यांनी आपल्या कुठल्याही मुलाला नोकरीला न लावता शेती करायला लावली त्यामुळे त्यांची मुले आज या परिसरात प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या घरी आजही एकत्र कुटुंब पद्धती आहे.

"त्या" भावा-बहिणीने केले रक्षाबंधनाचे शतक पूर्ण
अखेर पेट्रोल डिझेलच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचा भाव

आज आपल्याला समाजामध्ये मालकी हक्काच्या कायद्यात अनेक बदल झाल्यामुळे अनेक ठिकाणी जमिनीवरून भाऊ-बहिणीचे वाद झालेले पाहायला मिळतात मात्र अनुसया आणि गजानन या शतकवीर भाऊ बहिणीचे प्रेम समाजाला दिशादर्शक असून हे अतूट नाते आधुनिक युगात देखील खूप काही गोष्टी शिकवून जातात.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com