देशद्रोह्यांची पाठराखण करणाऱ्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही - श्वेता महाले

नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही असे वक्तव्य महाविकास आघाडीच्या वतीने करून देशद्रोही कृत्यांचे सुद्धा समर्थन केले जात असल्याची टीका सुद्धा श्वेता महाले यांनी यावेळी केली आहे.
shweta mahale
shweta mahaleSaam Tv
Published On

बुलढाणा - देशद्रोही दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याची मालमत्ता खरेदी करून त्या पैशातून देश विघातक कृत्य करणाऱ्यांना मदत करणारे सुद्धा देशद्रोही असून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे देशद्रोह्यांशी संबंध स्पष्ट झालेले असताना त्यांची पाठराखण करणाऱ्या आघाडी सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याचा घणाघाती आरोप भाजपा श्वेता महाले पाटील (Shweta Mahale) यांनी केला आहे.

हे देखील पहा -

नवाब मलिकांनी तातडीने राजीनामा द्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यल्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने अटक केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे होता.तसेच नवाब मलिक राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करायला पाहिजे असे देखील त्या यावेळी म्हणाल्या. नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही असे वक्तव्य महाविकास आघाडीच्या वतीने करून देशद्रोही कृत्यांचे सुद्धा समर्थन केले जात असल्याची टीका सुद्धा श्वेता महाले यांनी यावेळी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com