एका कोनशिलेमुळे श्रीगोंद्यातील राजकारण तापले

बबनराव पाचपुते, आमदार, श्रीगोंदा.
बबनराव पाचपुते, आमदार, श्रीगोंदा.साम टीव्ही
Published On

अहमदनगर : श्रीगोंद्यात ग्रामीण रुग्णालयात बसविलेल्या ऑक्सिजन प्लांटच्या कोनशिलेवरून प्रशासनाची कानशिलं चांगलीच गरम झाली आहेत. आमदार बबनराव पाचपुते यांनी झापल्याने त्यांची पंचाईत झाली आहे. त्यांनी संबंधितांवर हक्कभंग आणण्याचा इशारा दिला होता. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता. ती कोनशिलाच गायब झाली आहे. त्यामुळे नेमका कोणाचा अपमान झाला, याचीच चर्चा सोशल मीडियातून सुरू झाली आहे.

या उपक्रमास आमदार बबनराव पाचपुते यांनी निधी दिला होता. त्यातून हा प्रकल्प उभा राहिला आहे. मात्र, पाचपुते यांचेच नाव खालच्या बाजूस टाकले होते. एका मंत्र्यांचे नाव त्यांच्यावर होते. ते कार्यक्रमास उपस्थित नसल्याने पाचपुते चांगलेच चिडले होते. संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांनी सुनावले होते, तसेच विधानसभेत हक्कभंग आणण्याचा इशाराही दिला होता. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी काष्टी येथे जाऊन पाचपुतेंची मनधरणी केली होती.

बबनराव पाचपुते, आमदार, श्रीगोंदा.
नगरमध्ये कोरोनाचा धोका बळावला! तब्बल ६१ गावांत लॉकडाउन

आज दुपारी ती कोनशिला तेथून गायब झाली. आता पुन्हा ती कोनशिला लावली जाते का, त्यावर कोणाचे नाव टाकले जाते नि कोणाचे काढले जाते. यावर चर्वितचर्वण सुरू आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संघर्ष राजुळे यांनी तर तिसरेच कारण सांगितले. ते म्हणाले, अज्ञात व्यक्तीने कोनशिला फोडली होती. त्यामुळे ती काढून काढली. दुसरी कोनशिला का काढली, याचे उत्तर मिळू शकले नाही. त्यामुळे विरोधाभास समोर येत आहे. यावर विरोधी पक्ष नेमका काय भूमिका घेतो, याकडे लक्ष लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com