औरंगाबादेत मुख्याध्यपकांसह शिक्षकांवर मध्यान्न भोजनाने आणली उसनवारीची वेळ

पंचायत समितीनं मुख्याध्यापकांना धाडलं पत्र; उसनवारी करुन विद्यार्थ्यांना खिचडी द्या
File Photo
File Photo
Published On

औरंगाबाद - राज्य सरकारने शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्चपासून शाळेत मध्यान्न भोजन आहार सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र तांदूळच उपलब्ध नसल्यानं हा आहार अजून सुरु होवू शकला नाही. आता तांदळाचा तुटवडा पाहता, आणखी किमान १०-१५ दिवस अजूनही सुरु होण्याची शक्यता नाही. त्यासाठी औरंगाबाद (Aurangabad) पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने एक पत्र पाठवून उसनवारीवर मध्यान्न भोजन सुरू करा असे मुख्याध्यापक आणि शाळांना सांगितले आहे. त्यामुळे आता सरकारी शाळेत उसनवारीवर खिचडी करण्यासाठी शिक्षकांना आटापिटा करावा लागणार आहे.

हे देखील पहा -

राज्यातील शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजन म्हणून खिचडी देणे शक्य नव्हतं तर अधिवेशनात आहार योजना सुरु करण्याची घोषणा नक्की केली कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. धक्कादायक म्हणजे तांदुळाची कमतरता असल्याचं शासनालाही माहिती होतं, म्हणून १५ तारखेला काढलेल्या पत्रात शिक्षकांनी चक्क उसणवारीवर धान्य खरेदी करावे आणि आहार योजना सुरु करावी अशा प्रकारचा सल्ला देण्यात आला आहे. पुरवठादाराने धान्य पुरवल्यावर या सामानाचे समायोजन करावे असाही अजब सल्ला देण्यात आला आहे. म्हणजे तांदुळाच्या मोबदल्यात पुन्हा ज्यांच्याकडून घेतले आहे, त्यांना तांदुळ कसे करणार असा प्रश्न आहे.

File Photo
Mumbai Pune Express Highway: मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर अपघात; एक जखमी

आता नुसतं तांदूळचं नाही तर खिचडी बनवायला लागणारं साहित्य, भांडे, मोठ, मिरची,, तेल, मसाले याचीही उसनवारी करावी लागणार आहे. त्यासाठी आता लोकांना मदत मागावी म्हणजे लोकसहभागातून ही योजना सुरु करावी असा सल्ला सुद्दा देण्यात आलाय. शासनानं घोषणा केली आणि पुरवठा केला नाही त्यामुळं ही य़ोजना कागदावरच आहे, त्यात आता उसनवारीवर करा, सगळं साहित्य उधारीवर शिक्षकांनी बाजारपेठेतून विकत आणावे आणि पैशांना जबाबदार कोण असाही प्रश्न आहेच. मात्र सरकारी योजना आहे आणि ती सूरू करावी लागते किमान कागदावर म्हणून हा विद्यार्थ्यांसोबत खेळ शासनानं मांडला आहे. ही अवस्था फक्त औरंगाबादची नाही तर संपुर्ण राज्यात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com