नागपूर : पश्चिम बंगालमधील (West Bengal) दुर्गापूर शहरात कंडोमच्या विक्रीत अचानक वाढ झाली. दुकानात कंडोम (Condoms) विक्रीसाठी येताच लगेच साठा संपत आहे. याचं कारण शोधल्यावर या कंडोमचा उपयोग नशेसाठी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तरुणांमधील या नव्या व्यसनामुळे प्रशासनही चिंतेत पडलं आहे. (Students Get Addicted To Condoms Latest News)
असुरक्षित लैंगिक संबंधांपासून संरक्षण होण्यासाठी कंडोमचा वापर केला जातो. मात्र, पश्चिम बंगाल मधील दुर्गापूर येथील तरुण त्याचा वापर ड्रगप्रमाणे करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दुर्गापूरमधील दुर्गापूर सिटी सेंटर, विधाननगर, बेनाचिती आणि मुचीपारा, सी झोन, ए झोन अशा विविध भागात फ्लेवर्ड कंडोमच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे.
अचानक झालेल्या या वाढीमुळे आश्चर्यचकित झालेल्या एका स्थानिक दुकानदाराने वारंवार कंडोम खरेदी करणाऱ्या तरुणाला विचारले. तर मी नशेसाठी ते विकत घेतो, असं आश्चर्यकारक उत्तर त्यानं दिलं. दुर्गापूर येथील एका मेडिकल स्टोअरचालकानं सांगितलं की, पूर्वी दिवसाला केवळ 3 ते 4 पॅकेट कंडोम विकले जात होते, मात्र आता पूर्ण पॅक विकले जात आहेत.
तज्ज्ञांच्या मते कंडोममध्ये एक सुगंध असतो. त्याची नशेखोर नशा करतात. कंडोम मधील हे सुगंधी संयुग डेंड्राइट गममध्ये देखील आढळते. त्यामुळे अनेक लोक नशेसाठी डेंड्राइटचाही वापर करतात. गरम पाण्यात कंडोम जास्त वेळ भिजवून ठेवल्याने नशा होते. तरुण पिढीमध्ये काही तरुण जे नैराश्यामध्ये गेलेले किंवा चिंताविकाराने ग्रासले असतात ते नशेच्या आहारी जातात आणि त्यातून नशा करण्याचे वेगवेगळे मध्यम ते निवडतात.
ड्रग्ज महाग आणि सहज उपलब्ध होत नसल्याने अशा प्रकारच्या वस्तूंपासून ते नशा करतात. मात्र, अशा प्रकारच्या वस्तू किंवा पदार्थांपासून नशा केल्यानं त्यांच्या फुफ्फुस आणिमेंदू यावर त्याचा परिणाम होतो. शिवाय त्यांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती ढासाळते.
दरम्यान, नशेसाठी विचित्र गोष्टी वापरण्याची ही पहिलीच घटना नाही. 21 व्या शतकाच्या मध्यात, नायजेरियामध्ये टूथपेस्ट आणि शूच्या शाईची विक्री अचानक वाढली होती. यावेळी लोक त्याचा नशेसाठी वापर करायचे. मात्र, ही चिंतेची बाब असून या तरुणांना यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.