नाशिक : राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या मंत्री नारायण राणेंवर शिवसेनेकडून जोरदार प्रहार केला गेला. राणेंच्या अटकेनंतर जामीनावर त्यांची सुटका झाली. मात्र रस्त्यावरचा संघर्ष शमला असला तरी आता सेना - भाजपाच कागदोपत्री संंघर्ष सुरु झाला आहे. सामनाच्या अग्रलेखातून राणेंवर बोचरी टीका केली, याचंच फलित म्हणून आता सामनाच्या संपादक आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Shivsena Vs Rane: A complaint has been registered against Rashmi Thackeray in Nashik)
राणेंच्या त्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिवसेनेने राणेंना कडवा विरोध केला होता. याप्रकरणी त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले होते. त्यांना त्याच दिवशी जामीन मिळाला. मात्र दुसऱ्या दिवशी शिवसेनेचे मुखपत्र सामनातून नारायण राणेंवर जोरदार हल्ला केला गेला. ''भोकं पडलेला फुगा'' या शीर्षकांतर्गत लिहीण्यात आलेल्या अग्रलेखात नारायण राणेंवर प्रहार केला गेला. नाशिकमधील शिवसेना नेते अजय बोरस्ते यांनी थेट या अग्रलेखाचे मोठ-मोठे बॅनर्स छापून ते जागोजागी लावले. त्यामुळे हा वाद आणखीनच चिघळला. याबाबत नाशिकमधील भाजप स्थानिक भाजप कार्यकर्ते शिवाजी निवृत्ती बारके यांनी रश्मी ठाकरे आणि अजय बोरस्ते यांच्या विरोधात सरकारवाडा पोलिसा ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सामनाच्या २५ ऑगस्टच्या अग्रलेखात नारायण राणेंविरोधात भोकं पडलेला फुगा, बेडूक, छपरी गँगस्टर, उपटसुंभ, सरडा असे शब्द वापरण्यात आले होते. एका मंत्र्यासाठी हे शब्द वापरणे असंविधानिक आणि बदनामीकारक असल्याने ही तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सामनाचे संपादक पद त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंकडे आले होते. आता याच संपादकीय विभागातील अग्रलेखामुळे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.