राणेंचा चेहरा फक्त 'त्यांच्या'साठी महत्वाचा; खासदार राऊत

narayan rane vinayak raut
narayan rane vinayak raut
Published On

रत्नागिरी : नारायण राणे narayan rane हा चेहरा भाजपासाठी असेल परंतु जनतेसाठी हा चेहरा राहिलेला नाही. नारायण राणेंना त्यांची जागा दाखवण्याचे काम जनतेने यापूर्वीच जनतेने केलेले आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि राहील आणि तो भेदण्याचे काम नारायण राणे करू शकत नाहीत असा विश्वास खासदार राऊत narayan rane vinayak raut यांनी येथे व्यक्त केला.

महाराष्ट्रात भाजपची जन आशिर्वाद यात्रा आजपासून सुरु झाली आहे. त्यापार्श्वभुमीवर खासदार राऊत यांना माध्यमांनी प्रश्न केले असता ते म्हणाले ज्या पक्षाचं केंद्रीय नेतृत्व आहे. अविरत अशी सत्ता आहे. त्यांना महाराष्ट्रात जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्तानं गावागावात फिरावं लागतं याचाच अर्थ महाविकास आघाडी चांगले काम करीत आहे. या धास्तीपोटी महाराष्ट्रात आपले अस्तित्व टिकाव यासाठी ही जन आशीर्वाद यात्रा असल्याची टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला टक्कर देण्याचे स्वप्न जर भाजपाचे असेल तर ते स्वप्नभंग झाल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी नमूद केले.

narayan rane vinayak raut
कशी प्रशासनाने थट्टा मांडली.., जिवंत शेतक-याची मृत नाेंद केली

दरम्यान नारायण राणे यांच्याबाबतीत खासदार राऊत म्हणाले नारायण राणे हा चेहरा भाजपासाठी असेल परंतु जनतेसाठी हा चेहरा राहिलेला नाही. नारायण राणेंना त्यांची जागा दाखवण्याचे काम जनतेने यापूर्वीच केलेले आहे. काेकण आणि मुंबईवासियांनी त्यांना नाकारले. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि राहील आणि तो भेदण्याचे काम नारायण राणे करू शकत नाहीत असा विश्वास खासदार राऊत यांनी व्यक्त केला.

केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी लिहिलेले पत्र मीडियावर व्हायरल करून प्रसिद्धी मिळवणे हे योग्य नसल्याचे खासदार राऊत यांनी म्हटले. औरंगाबादच संभाजीनगर असे नामकरण व्हावे तसा प्रस्ताव राज्याने केंद्राकडे पाठवावा असे देखील त्यांनी एका प्रश्नास उत्तर देताना सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com