मुंबई : राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी (Presidential election 2022) एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना शिवसेना पाठिंबा देणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी मातोश्रीवर खासदारांसोबत बैठक घेतली आहे. मात्र, या बैठकीला शिवसेनेचे लोकसभेचे १२ खासदार उपस्थित असून इतर ६ खासदारांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. (Uddhav Thackeray Latest News)
गेल्या काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडाचे निशाण फडकवल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. अशातच शिवसेनेचे १२ खासदार एकनाथ शिंदे गटात सामील होणार असल्याच्या चर्चाही राजकीय मैदानात रंगल्या होत्या. त्यातच आता आजच्या मातोश्रीवर असलेल्या बैठकीला शिवसेनेचे दहा खासदार गैरहजर असल्याने पुन्हा एकदा शिवसेनेची कोंडी झाली आहे. बैठकीला गैरहजर असलेले दहा खासदार बंडखोरी करुन शिंदे गटाला पाठिंबा देतील, अशीही शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)
बैठकीला उपस्थित लोकसभा खासदार
गजानन कीर्तिकर, मुंबई नॉर्थ वेस्ट
अरविंद सावंत, मुंबई दक्षिण
विनायक राउत, रत्नागिरी- सिंधुदुर्ग
धैर्यशील माने, हातकणंगले
हेमंत गोडसे, नाशिक
राहुल शेवाले, दक्षिण मध्य मुंबई
श्रीरंग बारणे, पिंपरी चिंचवड
प्रताप जाधव, बुलढाणा
सदशिव लोखंडे, शिर्डी
ओमराजे निंबाळकर- उस्मानाबाद
राजेंद्र गावित- पालघर
राजन विचारे - ठाणे
ओमराजे निंबाळकर - उस्मानाबाद
राज्यसभा खासदार
1) संजय राउत, राज्यसभा
2) प्रियंका चतुर्वेदी, राज्यसभा
शिवसेनेचे अनुपस्थित खासदार
यवतमाळ-वाशिम - भावना गवळी
परभणी - संजय जाधव
कोल्हापूर - संजय मांडलिक
हिंगोली - हेमंत पाटील
कल्याण-डोंबिवली - श्रीकांत शिंदे
रामटेक - कृपाल तुमाने
दादरा-नगर हवेली - कलाबेन डेलकर
Edited By - Naresh shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.