Vinayak Raut Slams Deepak Kesarkar
Vinayak Raut Slams Deepak KesarkarSaam TV

Shiv Samvad Yatra | ...तर केसरकरांचे त्याचवेळी विसर्जन झाले असते; विनायक राऊतांची बोचरी टीका

Vinayak Raut Slams Deepak Kesarkar : विनायक राऊत यांनी बंडखोर आमदार दिपक केसरकर आणि संजय शिरसाठ यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
Published on

मुंबई: आज, सोमवारपासून शिवसेनेच्या (Shivsena) 'शिवसंवाद' यात्रेची सुरुवात कोकणातील कुडाळ येथून झाली. आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या उपस्थित शिवसैनिकांची मोठी गर्दी जमली होती, यावेळी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी आपल्या भाषणातून बंडखोरांवर हल्लाबोल केला आहे. विनायक राऊत यांनी बंडखोर आमदार दिपक केसरकर आणि संजय शिरसाठ यांच्यावर बोचरी टीका केली आहे. (Vinayak Raut Latest News)

हे देखील पाहा -

खासदार विनायक राऊत यावेळी म्हणाले की, आज आदित्य ठाकरे आपल्या कोकणात आले आहेत. उद्धव ठाकरेंची सभा जर झाली नसती तर केसरकरांचे त्याच वेळी विसर्जन झाले असते. कालच्या केसरकरांना मंत्रिपद दिलं, सर्व दिलं पण गद्दारांची ही औलाद आम्हाला मिळाली, यांना नक्की गाडणार अशी खरमरीत टीका त्यांनी दिपक केसरकरांवर केली आहे. दिपक केसरकर हे शिंदे गटात सामील झाले असून ते शिंदे गटाते प्रवक्ते आहेत.

Vinayak Raut Slams Deepak Kesarkar
Eknath Shinde : पुण्यात अवतरले चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे डुप्लिकेट

आपल्या भाषणात विनायक राऊत पुढे म्हणाले की, आदित्य यांची ही सभा उद्याच्या विजयाची सभा होईल. चार घरांची चव चाखून आलेला माणूस ठाकरे घराण्याला शिकवायला लागला. ज्या व्यक्तीचं बोट धरुन हा राजकारणात आला त्यांना ह्याने फेकून दिलं. पवारांच्या तोंडालाही यांनी पानं पुसली. शिवसेनेला फोडण्यासाठी पवारांना कसे काय जबाबदार धरता? मंत्रिपदासाठी तुम्ही शिंदे गटात गेला, पण शिवसेनेचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही. शिवसेनेचा नेता असावा तो संजय राऊत यांच्यासारखा असावा. जगेन तर शिवसेनेसाठी मरेन तेही शिवसेनेसाठी हा अभिमान आहे आम्हाला असंही दिपक केसरकर आपल्या भाषणात म्हणाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com