मुंबई: पत्राचाळ कथित गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना १०१ दिवसांनी विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पत्राचाळ व्यवहारात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाखाली संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने अटक केली होती. आज राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर शिवसेनेचे नेते आनंद व्यक्त करत आहेत. युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. (Sanjay Raut Bail granted aditya Thackeray gives first statement to media)
संजय राऊतांना जामीन मंजूर झाल्याने शिवसेनेची तोफ पुन्हा धडाडणार आहे. ते कोणत्याही कारवाईला घाबरले नाहीत. राऊत गद्दार झाले नाहीत, ते कोणत्याही कारवाईला घाबरले नाहीत. झालेल्या कारवायांना ते सामोरे गेले, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दिली आहे.
शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांना जामीन मिळाला आहे, त्याबद्दल आम्ही आनंद व्यक्त करत आहोत. ज्या गोष्टी न्यायप्रविष्ठ आहेत, त्याबद्दल बोलणं उचित नाहीय. राऊत यांच्यावर जे आरोप आहेत, ते सिद्ध झालेले नाहीयेत. जामीन मिळाला आहे, म्हणजे न्यायदेवतेला दिसतेय कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे, असं अंधारे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.