'रोखठोक'मधील टीकेला शहाजीबापू पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले, सगळेच आनंद दिघे नसतातच पण...

एका वर्षाने तुम्हाला चंद्रकांत खैरेंना भेटायला हिमालयाच्या गुहेत जावं लागेल - पाटील
MLA Shahajibapu Patil News
MLA Shahajibapu Patil NewsSaam TV

ठाणे: यंदाचा दसरा मेळाव्याला (Dasara Melava) एक वेगळं स्वरूप आलेला आहे. दोन मिळावे होतायत बीकेसी ग्राउंडवर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात होत आहे. तो हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांचा, ज्यांनी दिवस रात्र जीवाची परवा न करता शिवसेना वाढवली त्या आनंद दिघे यांच्या अस्मितेचा मेळावा होत आहे.

तर दुसरीकडे गेल्या अडीच वर्षांपूर्वी ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली अशा शिवसेनेचा (Shivsena) तो मेळावा असल्याचं वक्तव्य आमदार शहाजीबापू पाटील (MLA Shahajibapu Patil) यांनी केलं आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील मोजकेच काही मुद्दे उचलून बनवलेला टीचर म्हणजे बाळासाहेबांचे विचार नाही.

आज सकाळी मी एक टीचर पाहिला त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे साहेबांचं एक वाक्य आहे, 'शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येतात आणि निघून जातात' मात्र, आम्ही शिवसेनेतून गेलोच नाही, शिवसेनाच आमची आहे.

पाहा व्हिडीओ -

जे मागे राहिलेत त्यांनी असा विचार करावा. जे तुटपुंज गबाळ राहिले ते घेऊन मागे राहायचं का आमच्यात येऊन मिसळायचं हा त्यांचा खरा मनाचा मोठेपणा आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी ही खरी शिवसेना आहे.

हे ५० आमदार आणि १२ खासदारांनी सिद्ध करून दाखवलं आहे. सर्व जिल्ह्यातील जिल्हाप्रमुख आणि तळागाळातला शिवसैनिक शिंदे साहेबांकडे यायला लागला आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता ही शिंदे साहेबांच्या मागे खंबीरपणे उभी आहे फडणवीस साहेबांच्या पाठीशी उभी असल्याचा दावा पाटील यांनी केला.

एका वर्षाने खैरेंना भेटायला हिमालयाच्या गुहेत जावं लागेल -

तसंच यावेळी त्यांनी चंद्रकांत खैरेंवर (Chandrakant Khaire) देखील निशाणा साधला, विमानाचा रिझर्वेशन कसं करायचं हे मला माहिती आहे. रेल्वेचा रिझर्वेशन कसं करायचं मला माहिती आहे, हिमालयाची गुहा कशी रीजर्व करायची हे आम्हाला अजून कळलेली नाही, तिकडे दिल्लीला जाऊन एक गुहा त्यांच्यासाठी ठेवायची आहे. एका वर्षाने तुम्हाला चंद्रकांत खैरेंना भेटायला हिमालयाच्या गुहेत जावं लागेल असा टोला पाटील यांनी लगावला.

दरम्यान, बीके हुए क्या निष्ठा दिखायेंगे, असं अरविंद सावंत यांनी म्हटलं होतं त्यावर प्रतिक्रिया देताना शहाजी पाटील यांनी प्रतिउत्तर दिलं, 'मुळात अरविंद सावंत, विनायक राऊत आणि संजय राऊतांनी सगळं वाटोळ करून ठेवलं आहे. दुसरा वाक्य तुम्ही बोलता बाप चोरला हे वक्तव्य मुख्यमंत्री पद भूषवलेल्या एका मोठ्या माणसाच्या तोंडी शोभून दिसत नाही.

MLA Shahajibapu Patil News
Balasaheb Thorat: पितृपक्षात मंत्री मंत्रालयात आले, ना सरकारने निर्णय घेतले; शिंदे- फडणवीस सरकारवर थोरातांची टीका

हे जे घडलं आहे त्याच्यामुळे अख्खा महाराष्ट्र हादरला, तुम्ही इथे सगळ्यांनी विचार करा आपल्या मनाला विचारा एवढ्या वेगाने आणि एवढा झटक्याने सत्तांतर घडेल असं कोणाला वाटलं होतं का त्यामुळे हादरलेल्या माणसांना आमच्यावर काय बोलायचं हे त्यांना सूचेना मग विकत गेले खोके असे काहीतरी वाक्य काढायचं आणि बारक्या पोरांसारख बोलत बसायचं.

या सगळ्यांना जर शाळा कुठे चांगले असेल तरीही पहिलीला यांची सगळ्यांची ऍडमिशन घ्यावी लागेल अशी विचित्र माणस आहेत काही यांना अनुभव नाही असं पाटील म्हणाले. तर सगळेच आनंदी दिघे नसतात काही शिंदे असतात.

अशी टीका सामनामधून करण्यात आली आहे त्यावर प्रत्युत्तर देताना शहाजी पाटील यांनी सांगितले की, सगळेच आनंद दिघे नसतात हे बरोबरच आहे. पण त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांचं कार्य पुढे तेवढ्यात जोमाने जोराने निष्ठेने चालवणारा पण एखादाच एकनाथ शिंदे असतो हे त्यांनी लक्षात ठेवावं असंही पाटील म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com