Shivjayanti In Agra : आग्रा किल्ल्यात 'जय शिवाजी, जय भवानी' जयघोष घुमणार! शिवजयंती साजरी करण्यास अखेर परवानगी
Shivjayanti In Agra : शिवभक्तांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. आग्रा येथील ऐतिहासिक किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास पुरातत्व विभागाकडून परवानगी देण्यात आली आहे. औरंगाबाद येथील अजिंक्य देवगिरी फौंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील आणि महाराष्ट्र सरकार संयुक्त विद्यामाने या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत.
आग्रा येथील किल्ल्यात होणाऱ्या या शिवजयंती सोहळ्याला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य, महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शिवाजी महाराजांच्या जीवनाचा वेध घेणारा भव्य दिव्य असा सांस्कृतिक कार्यक्रमही यावेळी होणार आहे.
अजिंक्य देवगिरी फौंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी भारतीय पुरातत्त्व खात्याकडे आग्रा येथील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र पुरातत्व खात्याने त्यांना परवानगी नाकारली होती. त्यानंतर विनोद पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने राज्य सरकार सहआयोजक असेल तर परवानगी मिळेल असे म्हटले होते. (Latest Marathi News)
राज्य सरकार सहआयोजक असेल आणि राज्य सरकारने उत्तर प्रदेश सरकारला पत्र दिले तर परवानगी मिळेल, असे निर्देश दिल्ली हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना दिले होते. महाराष्ट्र सरकार देखील सहआयोजक होण्यास तयार झाले आहे. त्यामुळे आता आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.