शिवसैनिकाचा खून; एनसीपीच्या माजी पदाधिका-याच्या पतीवर गुन्हा

ncp shivsena
ncp shivsena
Published On

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ पालिकेच्या मतदार यादीतील बनावट नावांवर हरकत आणि घरकुलांच्या गहाळ फायलींवरून केलेल्या आंदोलनाचा राग मनात धरून दुचाकीला पाठीमागून टेंम्पोची धडक देऊन एका शिवसैनिकाचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. हा अपघात नसून खून करण्यात आल्याचा दावा करीत संबंधित शिवसैनिकाच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. अखेर संशयितांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल 18 तासानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. (shivena-karykarta-died-police-registered-case-against-four-ncp-solapur-crime-news)

बुधवारी रात्री 11 च्या सुमारास शहरातील गुरुनाथ मंगल कार्यालयाजवळ एक अपघात झाला हाेता. या अपघातात सतीश क्षीरसागर यांचा मृत्यू झाला. त्यांच्याबराेबर असलेले विजय सरवदे हे गंभीर जखमी झाले. सतीश क्षीरसागर हे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. त्यांचा हा अपघात नसून घातपात करण्यात आल्याचे म्हणणे त्यांच्या नातेवाईकांनी मांडत संबंधितांवर गुन्हा दाखल हाेईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भुमिका घेतली हाेती.

गुरुवारी (ता. 15) संशयितांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल 18 तासानंतर क्षीरसागर यांच्या मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला. त्यामुळे कांहीवेळा मोहोळ शहरामध्ये तणावाचं वातावरण होत. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा सरिता सुरवसे यांचे पती संतोष सुरवसे यांच्यासह चार जणांवर मोहोळ पोलिस ठाण्यात कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एकास अटक केल्याची माहिती अतिरिक्त पाेलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.

ncp shivsena
राजेश टाेपे म्हणाले, कोल्हापूरची स्थिती नक्कीच गंभीर; पण...

दरम्यान,मोहोळ पालिकेची निवडणूक जाहीर झाली होती. परंतु कोरोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली. शहरातील राजकारणात मात्र कार्यकर्त्यांचा संघर्ष चालूच होता. या घटनेमुळे मोहोळ शहरासह पुन्हा एकदा राष्ट्रवादी ncp विरुद्ध शिवसेना shivsena असा राजकीय संघर्ष उफाळून आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com