स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार

युती आघाडी होईल किंवा नाही पण शिवसेनेने 'एकला चलो रे' चा नारा देत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणारराजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडी सरकार आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने काही पक्ष स्वबळाची भाषा बोलू लागले आहेत. युती आघाडी होईल किंवा नाही होईल पण शिवसेनेनेही 'एकला चलो रे' चा नारा देत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. Shiv Sena will contest local body elections on its own

आज अलिबाग येथे झालेल्या शिवसेना रायगड जिल्हा कार्यकारणी सभेत स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर जिंकण्यासाठी कामाला लागा आणि सरकारची कामे लोकांपर्यत पोहचवा असा संदेश शिवसैनिकांना देण्यात आला आहे. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्यासाठी आतापासूनच रायगडात शिवसेनेने मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे.

हे देखील पहा -

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सेनाभवन येथे घेतलेल्‍या जिल्‍हाप्रमुखांच्‍या बैठकीत स्‍वबळाचा नारा दिला होता. त्‍यानंतर आज शिवसेना रायगड जिल्‍हा कार्यकारणीची बैठक अलिबाग येथे पार पडली. या बैठकीत 11 ते 24 जुलै दरम्‍यान राबवण्‍यात येणाऱ्या शिवसंपर्क अभियानाचा प्रारंभ करण्‍यात आला. शिवसंपर्क अभियान काय आहे याबाबत शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांना माहिती देण्‍यात आली. जिल्‍हाप्रमुख महेंद्र दळवी आणि संपर्कप्रमुख विलास चावरी यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

राज्यातील सत्तेत शिवसेना प्रमुख पक्ष आहे. आपण सत्तेत असलो तरी गाफील राहून चालणार नाही. पक्ष संघटना मजबूत करण्‍यावर भर द्या. त्‍यादृष्‍टीने विविध उपक्रम राबवण्‍यात यावेत. सत्‍तेच्‍या माध्‍यमातून केलेली विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवा, असे मार्गदर्शन जिल्‍हाप्रमुख महेंद्र दळवी यांनी केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार
जालन्यात अवैध गर्भपात आणि लैंगिक शक्तिवर्धक औषधांची विक्री !

पक्ष संघटना वाढीसाठी राज्‍यभर शिवसंपर्क अभियान राबवण्‍यात येत आहे. या माध्‍यमातून लोकापर्यंत पोहोचण्‍याची संधी आहे ती सोडू नका आणि जिल्‍हयातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्थांवर भगवा फडकवण्‍यासाठी सज्‍ज व्‍हा असे दळवी यांनी उपस्थित पदाधिकाऱ्याना सांगितले.

आगामी काळात नगरपालिका , पंचायत समिती व जिल्‍हा परीषदेच्‍या निवडणूका येऊ घातल्‍या आहेत. त्‍या स्‍वबळावर जिंकण्‍याच्‍या दृष्‍टीने कामाला लागा, असे आमदार महेंद्र दळवी यांनी उपस्थितांना सांगितले. संपर्कप्रमुख विलास चावरी यांनीही शिवसैनिक पदाधिकाऱ्याना मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेना सहसंपर्कप्रमुख सुरेंद्र म्‍हात्रे, महिला संघटिका दिपश्री पोटफोडे, कामगार नेते दीपक रानवडे, युवासेनेचे सुधीर ढाणे, पेण उपजिल्‍हाप्रमुख नरेश गावंड, अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी, पेण तालुकाप्रमुख अविनाश म्‍हात्रे, मुरूड तालुकाप्रमुख ऋषिकांत डोंगरीकर यांच्‍यासह सर्व उपजिल्‍हाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख उपस्थित होते.

Edited by : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com