औरंगाबाद : शिवसेनेच्या वतीने १ ते ३ नोव्हेंबर दरम्यान औरंगाबाद शहरातील ५० हजार घरांवर भगवे ध्वज लावून दिवाळी साजरी केली जाणार आहे. कोविड महामारीत अनेकांचे आप्तस्वकीय मरण पावले. त्यांना या दुःखातून बाहेर काढण्यासाठी शिवसेनेने यंदा दीपावलीनिमित्त वेगवेगळ्या न कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ४ नोव्हेंबर रोजी पहाटे पाच ते सात या वेळेत घाटी परिसरातील रुग्णांच्या नातेवाइकांसाठी अभ्यंगस्नान आयोजिले आहे. शिवसेनेच्यावतीने दीपावलीनिमित्त नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा ध्वज दिवाळी अभियान राबवण्यात येणार आहे.
हे देखील पहा :
किमान ५० हजार घरांवर भगवे ध्वज लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. १ नोव्हेंबरपासून तीन दिवस उपक्रम राबविला जाईल. शिवाय शिवसेना महिला आघाडीच्यावतीने शहरातील ३३ स्मशानभूममध्ये जाऊन म्हसनजोगी कुटुंबीयांना भाऊबीजेची भेट देण्यात येणार आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी ही माहिती दिली. गुरुवारी दिवाळीच्या पहाटे घाटी हॉस्पिटल परिसरात रुग्णांच्या नातेवाइकांसाठी सकाळी ५ ते ७ या वेळात अभ्यंगस्नान आयोजित केले आहे.
शिवसेनेच्यावतीने यावेळी गरम पाणी, उटणे, साबणाने अभ्यंगस्नानाची सोय केली जाणार आहे. शुक्रवारी आकाश दिव्याच्या धर्तीवर 'विकास दीप' लावण्यात येणार आहेत. शहरात होत असलेला व होणाऱ्या विकासाबाबतीत माहिती असलेले २०० "विकास दीप" ठिकठिकाणी लावण्यात येणार आहेत. ७ नोव्हेंबर रोजी रविवारी बीड बायपास फटाका मार्केट, टी.व्ही. सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज मैदान, नारळीबाग येथील पावन गणपती मंदिर परिसर या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांसाठी किल्ले बनवा स्पर्धा घेण्यात येणार आहे. रविवारी तापडिया नाट्यमंदिरात 'मी सावरकर बोलतोय' या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.