Solapur Breaking News: शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; लोकसभा निवडणुकीपूर्वीच बड्या नेत्याचा राजीनामा

Shivsena Shinde Group : माढा लोकसभेचे संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलाय. संजय कोकाटेंचा हा निर्णय शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Solapur Breaking News
Solapur Breaking NewsSaam TV
Published On

विश्वभूषण लिमये

Political News :

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अशात शिवसेना शिंदे गटाचे माढा लोकसभेचे संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी पक्षाला जयमहाराष्ट्र केलाय. संजय कोकाटेंचा हा निर्णय शिवसेना शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Solapur Breaking News
Mumbai Politics : संजय निरुपम अशोक चव्हाणांच्या भेटीला, बावनकुळेंच्या कॉमेंटमुळे लोकसभेच्या तोंडावर काँग्रेसची धाकधूक वाढली

भाजपने बुधवारी जाहीर केलेल्या यादीत माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर कोकाटेंनी हा निर्णय घेतला असून स्वत: यामागचं कारण देखील सागितलं आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्याला मदत केली नाही. तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांना जे कोणी सहकार्य करेल त्या कोणत्याही व्यक्ती आणि पक्षाला पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका संजय कोकाटे यांनी घेतली आहे.

राजीनामा दिल्यावर माध्यमांशी संवाद साधताना कोकाटेंनी भाजपवर गंभीर आरोप केलेत. भाजप मराठा आणि धनगर आरक्षणसंदर्भात समाजमध्ये भांडण लावत आहे, असा आरोप करत माढा संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना शिंदे गटाचा राजीनामा दिलाय.

माढ्यात संजय कोकाटे यांनी राजीनामा दिल्याने शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका बसला आहे. आता कोकाटे आगामी लोकसभेच्या दृष्टीने काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणारे.

Solapur Breaking News
Maharashtra Election 2024 BJP Candidates: भाजपची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रात कुणाकुणाला मिळाली उमेदवारी?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com