तुमच्या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला; उद्धव ठाकरेंकडून सेनेच्या 'या' आमदाराचं कौतुक

कुडाळ- मालवणचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) हे शिवसेनेसोबत राहीले. याची दखल घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वैभव नाईक यांना पत्र पाठवून कौतुक केलं आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray saam tv
Published On

विनायक वंजारे

सिंधुदुर्ग : शिवसेनेचे तब्बल चाळीस आमदार बंडखोरी करत शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. त्यात सिंधुदुर्गचे पालकमंत्री असलेले उदय सामंत व सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी देखील बंडखोरी केली. मात्र, कुडाळ- मालवणचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) हे शिवसेनेसोबत राहीले. याची दखल घेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वैभव नाईक यांना पत्र पाठवून कौतुक केलं आहे. (Uddhav Thackeray News In Marathi )

Uddhav Thackeray
'मविआ'त आमची गळचेपी; पुणे सहसंपर्क प्रमुखांसह युवासेना राज्य सहसचिवांचा सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र!

शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेत उभी फूट पडली आहे. उद्धव ठाकरे यांनाही मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं आहे. त्यामुळे शिवसेनेपुढे मोठं पक्ष संकट उभ ठाकलं आहे. या राजकीय संकटात शिवसेनेचे मोजके आमदार उद्धव ठाकरेंसोबत आहेत. तर बंडखोर आमदारांनी भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केली आहे.

बंडखोर नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत बंडखोरी झाली. या राजकीय संकटातही ठाकरे पिता-पुत्रांनी पक्षाला उभारी देण्यासाठी कंबर कसली आहे. शिवसेनेत मोठी बंडखोरी झाल्यानंतरही कुडाळ- मालवणचे आमदार वैभव नाईक हे शिवसेनेसोबत राहिले. याची दखल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली असून त्यांना पत्र लिहून त्यांचे कौतुक केलं आहे.

Uddhav Thackeray
शिंदे सरकारचे भवितव्य ठरवणारी, सर्वोच्च न्यायालयातील उद्याची सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता

उद्धव ठाकरेंचे पत्र जसेच्या तसे...

प्रिय शिवसेना आमदार श्री. वैभव विजय नाईक,

जय महाराष्ट्र!

शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहे. निष्ठा व अस्मितेची महती हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनीच आपल्याला शिकवली. आईच्या दुधाशी बेईमानी करु नका हा त्यांचा निष्ठेबाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्माननीय शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत व वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक असल्याचे दाखवून दिलेत. कोणत्याही धमक्या वा प्रलोभनाला बळी न पडता आपण निष्ठेने शिवसेनेसोबत राहिलात, आपल्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला व शिवसेनेस बळ मिळाले.

आई जगदंबा आपणांस निरोगी उदंड आयुष्य देवो.

आपला नम्र,

उद्धव ठाकरे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com