शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसैनिक आक्रमक; खासदार श्रीकांत शिंदेंचे कार्यालय फोडलं

शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचे कार्यालय फोडल्यानंतर बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचे उल्हासनगरमधील कार्यालय फोडण्यात आलं आहे. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Shrikant Shinde
Shrikant Shinde saam tv
Published On

अजय दुधाणे

उल्हासनगर : शिवसेनेचे जेष्ठ नेते, मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या बहुतांश आमदारांच्या बंडाळीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) त्यांच्यासोबत ५० आमदारांचा दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. त्यानंतर शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचे कार्यालय फोडल्यानंतर बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचे उल्हासनगरमधील कार्यालय फोडण्यात आलं आहे. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ( Maharashtra Political crisis News In Marathi )

Shrikant Shinde
मोठी बातमी! शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांचं नेतेपद काढलं

एकनाथ शिंदे आणि बहुतांश शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर गेले दोन-तीन दिवस ठाण्यात शांतता होती. एकनाथ शिंदे गटाच्या भूमिकेमुळे शिवसेनेतील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर शिवसैनिक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. पालघरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेल्या बॅनरला काळे फासण्यात आलं आहे. तसेच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचेही कार्यालय शिवसैनिकांकडून फोडण्यात आलं. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे कार्यलय देखील फोडण्यात आलं आहे.

Shrikant Shinde
मोठी बातमी : शिवसैनिक आक्रमक! बंडखोर एकनाथ शिंदे यांचा बॅनर फाडला, काळी शाई फेकून निषेध

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर भागात शांतता असताना आज श्रीकांत शिंदे यांचं गोलमैदान येथे असलेल्या जनसंपर्क कार्यालयाचे संतप्त शिवसैनिकांनी तोडफोड केली. यावेळी त्यांच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. आज दुपारी हा प्रकार घडला. सहा सात शिवसैनिकांनी शिंदे यांच्या कार्यालय असलेल्या बोर्डची तोडफोड केली. या तोडफोडीनंतर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्यानंतर शिवसेनेचे काही नगरसेवक या कार्यालयात आता येथे पोहोचले असून झालेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करत आहे. सुरेश पाटील या शिवसैनिकाने ही तोडफोड केली असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com