- तबरेज शेख
Karnataka Maharashtra Border Dispute : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी साेलापूर, काेल्हापूरात भवन उभारण्याची घोषणा केली असेल तर आनंदच आहे. आम्हांला देखील बेळगावात, बंगळूरमध्ये महाराष्ट्र भवन उभे करायचे आहे त्यासाठी जागा द्या अशी मागणी खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केली.
कर्नाटक सीमावादावरुन राज्यातील वातावरण गरम झाले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या भुमिकेवर राज्यातील विराेधक आक्रमक झाले आहेत. आज संजय राऊत यांनी बाेम्माई यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माध्यमांशी बाेलताना समाचार घेतला.
संजय राऊत म्हणाले मुख्यमंत्री शिंदे हे गुवाहटीला गेले हाेते. तेथून आल्यानंतर त्यांनी येथे आसाम भवन बांधण्याचा निर्धार व्यक्त केला. आनंद आहे. यामुळे राष्ट्रीय एकात्मकता घट्ट हाेईल. बाेम्माईंच्या घाेषणेवर राऊत म्हणाले मुंबईत देखील कर्नाटकातील लाेकांची भवन आहेत. आमचा वाद नाही ताे तुम्ही निर्माण करीत आहेत.
परंतु एका इर्षेने काही मागणी कराल तर त्यास आमचा विरोध आहे. दरम्यान बेळगाव (belgaum) आणि बंगळूर येथे प्रथम महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी आम्हांला जागा द्या असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.