मनसे, भाजप, MIM एकच, त्यांचे विचारही सारखेच, शिवसेनेच्या दानवेंचा टोला

Aurangabad : सुरुवातीला मनसे, त्यानंतर एमआयएम आणि आता भाजप औरंगाबामध्ये सभा घेऊन मोर्चा काढणार आहे.
Shivsena Mla Ambadas Danave
Shivsena Mla Ambadas DanaveSaam Tv

औरंगाबाद : एकीकडे राज्यात सध्या हिंदुत्वावरून राजकारण तापलं असताना दुसरीकडे औरंगाबादेत (Aurangabad) शिवसेना आमदार अंबादास दानवे (Shivsena Mla Ambadas Danave) यांनी खळबळजनक विधान केलं आहे. मनसे (MNS), भाजप (BJP) आणि एमआयएम (AIMIM) हे एकच आहेत. या तिघांचे विचारही सारखेच आहेत. तसेच तिघे एकमेकांना सिंडिकेट करून काम करीत आहेत, असा खळबळजनक आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. शिवसेना (Shivsena) मजबूत आहे, सिंडिकेट करून औरंगाबादेत आव्हान देणाऱ्या तिघांनाही परतवून लावेल,असा इशाराही अंबादास दानवे यांनी दिला आहे. (Aurangabad Latest Marathi News)

Shivsena Mla Ambadas Danave
तुम्ही दोनदा पंतप्रधान झालात, अजून काय हवंय?; नरेंद्र मोदींनी दिलं भन्नाट उत्तर

1 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी औरंगाबादेत जाहीर सभा घेतली होती. त्यांच्या सभेनंतर राजकीय वर्तुळात मोठा वादंग उठला होता. दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेनंतर शुक्रवारी औरंगाबादमध्ये एमआयएमची सभा पार पडली. या सभेला अकबरुद्दीन यांच्यासह एमआयएम खासदार इम्तियाज जलील, वारीस पठाण यांची उपस्थिती होती. आता एमआयएमच्या सभेनंतर भाजपही औरंगाबाद येथे सभा घेऊन शिवसेनेला डिवचवण्याचा प्रयत्न करणार आणि आव्हान देणार अशी चर्चा सुरू झाली आहे. यावर बोलतांना शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे.

सुरुवातीला मनसे, त्यानंतर एमआयएम आणि आता भाजप औरंगाबामध्ये सभा घेऊन मोर्चा काढणार आहे. त्यावरून हे तिनही पक्ष शिवसेनेला डिवचत असल्याच्या चर्चा जिल्ह्यात रंगू लागल्या आहेत. यावर उत्तर देतांना शिवसेना आमदार अंबादास दानवे म्हणाले की, "मनसे, भाजप आणि एमआयएम हे एकच आहेत. या तिघांचे विचारही सारखेच आहेत. तसेच तिघे एकमेकांना सिंडिकेट करून काम करीत आहेत. मात्र असं असलं तरी इथे शिवसेना मजबूत आहेत. सिंडिकेट करून औरंगाबादेत आव्हान देणाऱ्या तिघांनाही शिवसेना परतवून लावेल"

Shivsena Mla Ambadas Danave
"औरंगजेबाला याच मातीत गाडलं; आता त्याच्या भक्तांनाही"..., संजय राऊतांचा इशारा

पुढे बोलतांना अंबादास दानवे यांनी एमआयएमवर निशाणा साधला आहे. "संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या अगोदर अकबरुद्दीन ओवेसी यांनी औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवली त्यात काही नवीन नाही. जी औरंगजेबाची विचारसरणी होती, ती एमआयएमची आहे. त्यांनी तशी वृत्तीही दाखवली आहे, एमआयएम देश तोडणारी संघटना आहे, आम्ही देश जोडणारे आहोत, ती काय आम्हाला आव्हान देणार"? दरम्यान, फडणवीस यांच्या 23 मे रोजी पाणी प्रश्नावरील मोर्चावर सुद्धा अंबादास दानवेंनी टीकास्त्र सोडलं आहे. सोलापूर, नागपूर, अकोला, अमरावती आणि अनेक ग्रामीण भागात पाणीप्रश्न आहे, हे पाहावं. तिथंही फडणवीस यांनी मोर्चे काढायला हवेत. देवेंद्र फडणवीस आता मुद्दामहून औरंगाबादला येत आहेत, हे नाही कळायला आम्ही काही दूधखुळे नाहीत. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com