Shivsena: होय, शिवसैनिक काँग्रेसलाच मतदान करणार - उद्धव ठाकरे

हिंदू अडचणीत असताना जो गरजेला येतो, तो खरा हिंदुह्रदयसम्राट, या देशात एकच हिंदूह्रदयसम्राट आहे बाकी भाजपने जो नकली हिंदूह्रदयसम्राट तयार करण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न लोकांनी झिडकारला.
महाराष्ट्राला बदनाम करण्याचा विकृतपणा- उद्धव ठाकरे
महाराष्ट्राला बदनाम करण्याचा विकृतपणा- उद्धव ठाकरेSaam Tv
Published On

कोल्हापूर : मुंबई आज कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांना मतदान करा असं आवाहन करण्यासाठी कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधत असताना त्यांनी भाजपवरती जोरदार हल्लाबोल केला. तसंच शिवसैनिक काँग्रेसला (Congress) मतदान करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.

ते विरोधकांना उद्देशून म्हणाले, 'ते म्हणतात की, ताराराणी चौकात पाठामागे हॉर्डींग असायचं त्यामध्ये भगवे वस्त्र आणि रुद्राक्षाची माळ घातलेला बाळासाहेबांचा फोटो असायचा मात्र आता ते कुठं आहे.' मात्र मी विरोधकांना एकच सांगू इच्छितो की या देशात एकच हिंदूह्रदयसम्राट आहेत. बाकी भाजपने जो नकली हिंदूह्रदयसम्राट तयार करण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न लोकांनी झिडकारला, त्यामुळे देशात फक्त एकच हिंदूह्रदयसम्राट आहे. जो हिंदु अडचणीत असताना गरजेला येतो तो खरा हिंदुह्रदयसम्राट असही मुख्यमंत्री म्हणाले.

शिवाय आता सोनियांचा फोटो आमच्या पाठीमागे आसा म्हणत आहेत. मात्र, आम्ही अटलजींचा आणि नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) देखील फोटो लावला होता, मात्र, ते फोटो काढण्याची परिस्थिती तुम्हीच निर्माण केली असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

हे देखील पहा -

तसंच बाळासाहेब ठाकरेंच्या नावासमोर तुम्ही जनाब लावायचा नीच प्रयत्न केलात. तुम्हाला जर खरच त्यांच्याबद्दल येवढ प्रेम असेल तर नव्या एअरपोर्टला, नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नावं द्या; सरकारमध्ये असतानाही आम्ही मागणी केली मात्र तुम्ही ते नावं दिलं नाही. शेवटी आमच्या सरकारने हे नावं दिल असही उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच आम्ही काँग्रससोबत गेलो, आता शिवसेना काँग्रेसला मतदान करणार का, तर होय, शिवसैनिक काँग्रसलाच मतदान करणार, कारण आम्ही नाटक नाही असं म्हणत त्यांनी शिवसैनिकांनी काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहनच केलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com