Shiv Jayanti : ७ क्विंटल रांगोळीच्या माध्यमातून साकारली महाराजांची भव्यदिव्य प्रतिमा

रांगोळीच्या माध्यमातून, 96 तासांच्या मेहनतीनंतर साकारली शिवाजी महाराजांची पाच हजार चौरस फुटांमध्ये प्रतिमा
Shiv Jayanti : ७ क्विंटल रांगोळीच्या माध्यमातून साकारली महाराजांची भव्यदिव्य प्रतिमा
Shiv Jayanti : ७ क्विंटल रांगोळीच्या माध्यमातून साकारली महाराजांची भव्यदिव्य प्रतिमाSaamTvNews
Published On

नंदुरबार : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने शहाद्यातील एका तरुणीने रांगोळीच्या माध्यमातुन शिवाजी महाराजांची (Shivaji Maharaj) पाच हजार स्वेअरफिट मध्ये प्रतिमा साकारली आहे. बी फार्मसी ची विद्यार्थीनी असलेल्या वैष्णवी पाटीले हिने शहादा (Shahada) कृषी उत्पन्न बाजारा समितीच्या आवारात तब्बल 96 तासांच्या मेहनतीनंतर हि प्रतिमा साकारली आहे.

हे देखील पाहा :

यासाठी तिने सहा ते सात क्विंटल रांगोळीचा वापर केला असुन चार दिवसांच्या अथक परिश्रमानंतर रांगोळीचे चित्र पुर्ण झाले आहे. पहिल्यांदाच इथक्या मोठ्या प्रमाणात रांगोळीमधुन शिवरायांची प्रतिमा साकारली गेली असल्याने शिवप्रेमी देखील हि रांगोळी पाहण्यासाठी आवर्जुन उपस्थिती लावत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com