Shirpur News: दुचाकी पुलावर लावून आधारकार्ड ठेवत नदीत मारली उडी; दोन दिवसांनी सापडला मृतदेह

दुचाकी पुलावर लावून आधारकार्ड ठेवत नदीत मारली उडी; दोन दिवसांनी सापडला मृतदेह
Shirpur News
Shirpur NewsSaam tv

शिरपूर (धुळे) : सावळदे (ता. शिरपूर) येथे तापी नदीत उडी टाकून आत्महत्या केली. या युवकाचा मृतदेह १० एप्रिलला (Shirpur News) दुपारी हाती लागला. मृताची ओळख पटली असून तो पंकज शिवदास पाटील (वय ४५, रा.जवखेडा ता.अमळनेर) असल्याचे निष्पन्न झाले. (Maharashtra News)

Shirpur News
Cyber Crime: ऑनलाईन गेम खेळताना बहिणीच्‍या अपहरणाची धमकी; १० वर्षीय मुलाकडून लाटले १ लाख रूपये

शिरपूर तालुक्‍यातील सावळदे येथे दोन दिवसांपूर्वी तापी नदीच्या पुलावर दुचाकी उभी असल्‍याचे आढळून आले होते. गाडीजवळ शर्ट, चपला व आधार कार्ड आढळले होते. आधार कार्डवर पंकज शिवदास पाटील असे नाव होते. घटनास्थळावरील परिस्थितीवरुन नदीपात्रात संबंधिताने उडी टाकल्याचा संशय व्यक्त करून शोधास सुरुवात झाली.

Shirpur News
Ambarnath News: चुकीच्या पद्धतीने भूसंपादन केल्याने शेतकरी आक्रमक; अंबरनाथमध्ये अर्धा राज्य महामार्ग केला बंद

दोन दिवसांनी सापडला मृतदेह

नदीत उडी मारून आत्‍महत्‍या केलेल्‍या युवकाचा मृतदेह दोन दिवसांनी १० एप्रिलला दुपारी हाती लागला. तपासणीत मृत पंकज शिवदास पाटील असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा चुलत शालक तथा खर्दे पाथर्डे येथील रहिवासी भिकन पाटील यांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com