Shirdi Sai Baba
Shirdi Sai BabaSaam tv

Shirdi : 'मविआ' ला न्यायालयाचा दणका; शिर्डीच्या साई संस्थानचं विश्वस्त मंडळ बरखास्त (व्हिडिओ पाहा)

दाेन महिन्यांत नेमावे लागणार नवे विश्वस्त मंडळ.
Published on

- माेबीन खान

Shirdi Saibaba Sansthan News : मविआने (mva) शिर्डीच्या साई मंदिराचे नियुक्त केलेले विश्वस्त मंडळ बरखास्त करावे असा निकाल न्यायालयाने दिला आहे. सामाजिक कार्यकर्ते उत्तम शेळके यांंनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयाची माहिती साम टीव्हीला दिली.

शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते उत्तम शेळके म्हणाले न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारने नेमलेले विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले आहेत. साई संस्थानच्या घटनेनुसार नेमणूक झाली नसल्याचा आक्षेप न्यायालयात नाेंदविला हाेता. पुढील दाेन महिन्यांत नवे विश्वस्त मंडळ नेमावे असा आदेश न्यायालयाने केल्याचे शेळकेंनी नमूद केले.

यापुर्वी आघाडी सरकारने 16 सदस्यांची केली होती नेमणूक. विश्वस्तपदांसह अध्यक्ष राष्ट्रवादी काॅग्रेसचा, उपाध्यक्ष शिवसेनेचा आणी विश्वस्त काॅग्रेसचे असे झालेले होते वाटप. दरम्यान या निर्णयानंतर आता राज्य सरकारला नवीन विश्वस्त मंडळ नेमावे लागणार आहे. तूर्तास जिल्हा न्यायाधीश साई मंदिराचा कारभार पाहणार आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Shirdi Sai Baba
'ती माझ्याशी बोलत नव्हती म्हणून मी तिचा गळा आवळला'; २४ दिवसानंतर खूनाचा छडा, तिघे अटकेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com