महाविकास आघाडीचं सरकार उलथवून स्थापन झालेलं एकनाथ शिंदेंचं सरकार हनी ट्रॅपमुळेच.... या विजय वडेट्टीवारांच्या दाव्याने राज्यात खळबळ उडालीय... तर त्याचे आपल्याकडे भक्कम पुरावेच असल्याचा दावा करुन वडेट्टीवारांनी शिंदे गटाचं टेन्शन वाढवलंय...
नाशिकच्या दौऱ्यात एका बड्या राजकीय नेत्यानं हनी ट्रपबद्दल गोप्यस्फोट केल्यानंतर याचे विधानसभेत पडसाद उमटले. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी थेट पेन ड्राईव्ह दाखवत राज्यातील 72 उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसह आजी माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा आरोप केला. नाशिक आणि ठाणे हनी ट्रॅपचं केंद्र असल्याचंही नमूद केलं. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पटोलेंचा दावा फेटाळून लावला
.विशेष म्हणजे नाशिकच्या हॉटेलमधील ती बहुचर्चित रूम सील केल्याची चर्चा आहे. याआधी सप्टेंबर 2019 मध्ये मध्य प्रदेशात हनी ट्रॅपमध्ये 8 मंत्री अडकल्याचा आरोप झाला होता... त्यानंतर अवघ्या 6 महिन्यात सत्तांतर झालं.. तर कर्नाटकमध्ये 48 राजकीय नेते हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचं प्रकरण समोर आलंय.. त्यामुळे मध्यप्रदेश आणि कर्नाटकनंतर महाराष्ट्रातही शिंदे सरकार हनी ट्रॅपमुळे आलंय का? अशी चर्चा आता रंगलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.