Samruddhi Mahamarg : समुद्धी महामार्गाबाबत मोठी अपडेट; शिंदे -फडणवीस सरकारने अधिकाऱ्यांना दिल्या महत्वाच्या सूचना

समुद्धी महामार्गाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या २०२४ च्या निवडणुकांपूर्वी समृद्धी महामार्ग पूर्ण करण्याचं शिंदे - फडणवीस सरकारच लक्ष असणार आहे.
Samruddhi Mahamarg
Samruddhi MahamargSaam tv

Samruddhi Express Highway Update : समुद्धी महामार्गाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या २०२४ च्या निवडणुकांपूर्वी समृद्धी महामार्ग पूर्ण करण्याचं शिंदे - फडणवीस सरकारच लक्ष असणार आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर ते मुंबई ७०१ कि.मी.चा समृद्धी महामार्ग येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला ७०१ किलोमीटरचा नागपूर - मुंबई (Mumbai) हायस्पीड ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे असलेला हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग येत्या डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्णत्वास नेण्याचं शिंदे - फडणवीस सरकारच उद्दिष्ठ असल्याच समोर आलं आहे.

MSRDC च्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार तशा सूचना सरकार ने समृद्धी महामर्गावरील अधिकाऱ्यांना दिल्या असून हा महामार्ग सध्या नागपूर ते शिर्डी पर्यंत सुरू झालेला असून लवकरच दुसरा ४४ की.मी चा टप्पा सिन्नर पर्यंत सुरू होणारं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Samruddhi Mahamarg
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर आला गुरांचा मोठा कळप; वाहतूक पोलिसाची दमछाक, VIDEO व्हायरल

पुढच्या वर्षी म्हणजे २०२४ मध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुका लागण्या आधी समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण करून हा महामार्ग सुरू करण्याचं उद्दिष्ठ सरकारच असल्याच यावरून स्पष्ट होत आहे.

समृद्धी महामार्ग हा शिंदे - फडणवीस सरकारच प्राधान्य असलेल्या प्रोजेक्ट पैकी सर्वात वर असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. तसेच सध्या सिन्नर पासून इगतपुरी पर्यंत घाट सेक्शन असल्याने काम सुरक्षित पणे सुरू आहे. त्याचबरोबर आम्ही लक्षाच्या आधीच हा पूर्णत्वास नेऊ असही समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे.

समृद्धी महामार्ग कसा असणार आहे?

राज्याच्या विकासासाठी समृद्धी महामार्ग गेमचेंजर ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाबाबत व्यक्त केला होता. ७०१ किलो मीटर लांबीचा हा समृद्धी महामार्ग आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूर (Nagpur) प्रवास हा १७ तासांवरून हे अंतर ७ तासांवर येणार आहे.

देशातील सर्वात मोठा हरित मार्ग असणार आहे, कारण या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी ११ लाख वृक्ष असणार आहे. तर राज्यातील एकूण ३६ टक्के लोकसंख्येला या महामार्गाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पासाठी ५५,३५५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

Samruddhi Mahamarg
Samruddhi Highway : अति घाई, संकटात नेई! समृद्धी महामार्गावरून सुसाट जाताय? मग ही बातमी वाचाच...

राज्यातील १० जिल्ह्यातील, २६ तालुक्यातील ३९१ गावांमधून हा महामार्ग जाणार आहे. फडणवीस यांचे आमदार असताना नागपूर-मुंबई अंतर कमी करण्याचे स्वप्न होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com