शेगाव पोलिसांनी आठवड्यापुर्वी रात्रीच्या सुमारास सुमारे ३० क्विंटल रेशनचा तांदूळ अवैध वाहतूक होत असताना पकडला. त्यानंतर संबंधित तांदुळ हा पाेलिसांनी त्यांच्या ताब्यात ठेवला. या प्रकरणात कारवाई करण्यासाठी तसेच अधिक तपास करण्यासाठी पाेलिसांना तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाचा अहवाल आवश्यक होता.
त्याबाबत पोलिसांनी शेगाव तहसीलदार यांना पत्र देऊन अहवाल मागविला होता. मात्र पोलिसांना तहसील कार्यालयाकडून अहवाल मिळत नव्हता. दरम्यान प्रकरण चव्हाट्यावर आल्याने मंगळवारी (ता. 20) सायंकाळी काही कागदपत्र पाेलिसांना मिळाली.
अखेर आठवड्याभरानंतर पोलिसांच्या ताब्यातील रेशनच्या तांदूळ प्रकरणी अहवाल मिळला. हा तांदूळ रेशनचाच असल्याचे अहवालात नमूद हाेते. त्यानूसार पाेलिसांनी बुधवारी रात्री उशिरा या प्रकरणी दाेघांवर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अवैधरित्या रेशनचा तांदुळ वाहतुक करणारा वाहन चालक मोहम्मद इस्माईल मोहम्मद इकबाल (बाळापुर) आणि दीपक धमाळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकारी नितीन इंगोले हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.