सातारा : जिहे-कठापूर योजनेचे सर्व श्रेय हे महाविकास आघाडीच आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते लवकरच या योजनेचे उद्घाटन करण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी नमूद केले. आज पहाटेच्या सुमारास आमदार महेश शिंदे यांनी जिहे-कठापूर याेजनेचे जलपूजन करुन राजकीय वर्तुळात चर्चा घडवून आणली. त्यापार्श्वभुमीवर आमदार शशिकांत शिंदे यांनी या याेजनेसाठी असंख्य लाेकांनी परिश्रम घेतल्याचे सांगत लवकरच महाविकास आघाडीच्या माध्यमातून मान्यवरांच्या हस्ते अधिकृत उदघाटन केले जाईल असे स्पष्ट केले. shashikant-shinde-birthday-on-mahesh-shinde-khatav-satara-political-news-sml80
आमदार शशिकांत शिंदे म्हणाले जिहे कठापूरचा प्रकल्प हा एका दिवसात उभा राहिलेला नाही. जे लोक युतीच्या काळात त्या वेळचे तत्कालिन मुखमंत्री देवेंद्र फडणवीस आणी गिरीश महाजन यांचा उदो उदो करत होते ते अपघाताने आज शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांनी फक्त लक्ष्मण इनामदारांचे नाव घेण्यापुरते काम केले आहे. माझ्याकडे पुरावे आहेत. केंद्र सरकारने एकही रुपया या योजनेसाठी दिलेला नाही.
मोदीजींचा आणि इनामदार यांचे काहीही संबंध नाही या याेजनेस बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. हे सर्व श्रेय महाविकास आघाडीचे असून यात भाजपचा काहीही संबंध नाही. आमदार महेश शिंदे यांनी दाखवून द्याव केंद्रातील मोदींनी याेजनेस एक रुपया दिला आहे का अन् त्यांनी दाखविल्या मी पाहिजे ती शर्त (पैज) हरायला तयार असल्याच आमदार शिंदे यांनी नमूद केले.
edited by : siddharth latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.