पवार-ठाकरेंना हवी मनसे? काँग्रेसला राज ठाकरे नकोसे?

Sharad Pawar Role In Negotiating: राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे आग्रही असल्याची माहिती समोर आलीय.. मात्र राज ठाकरेंना काँग्रेसचा विरोध नेमका का आहे?
Sharad Pawar and Uddhav Thackeray discuss the possibility of bringing Raj Thackeray into the MVA alliance as Congress maintains resistance.
Sharad Pawar and Uddhav Thackeray discuss the possibility of bringing Raj Thackeray into the MVA alliance as Congress maintains resistance.Saam Tv
Published On

उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत आपली भूमिका स्पष्ट केलीय... दुसरीकडे शरद पवारांनीही राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतलीय...राज ठाकरेंसह व्होटचोरी विरोधातील सत्याचा मोर्चा एकत्र काढता मग निवडणूक वेगळी का लढवता? असा सवाल पवारांनी केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय..तर दुसरीकडे या सल्ल्यानंतरही काँग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम आहे... मात्र राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत काँग्रेस हायकमांडशी चर्चा सुरु असल्याचं ठाकरेसेनेनं म्हटलंय..

दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपला रोखण्यासाठी विरोधकांची मोट बांधण्याचे संकेत दिलेत... तर मनसेनं मात्र महाविकास आघाडीत सहभागी होण्याबाबत सावध भूमिका घेतलीय... खरंतर महाविकास आघाडीने लोकसभा निवडणूक एकत्र लढवली.. त्यामुळे मुंबईतील 6 पैकी 4 तर राज्यात 30 जागांवर विजय मिळवला... मात्र त्यानंतर विधानसभेला महाविकास आघाडीत जागावाटपामध्ये जोरदार रस्सीखेच रंगली.. त्याचाच फटका बसल्यानं महाविकास आघाडीचा सुफडा साफ झाला... आता हिंदीसक्तीविरोधात आधीच ठाकरे बंधू एकत्र आलेत.. त्यांची युती जवळपास निश्चित मानली जातेय... त्यातच आता पवारही राज ठाकरेंसोबत युतीसाठी आग्रही असल्याची चर्चा आहे...मात्र पवार आग्रही असतानाही काँग्रेसला राज ठाकरे का नकोसे झालेत?

राज ठाकरेंची आक्रमक हिंदुत्ववादी आणि मराठी भूमिका

मराठीच्या मुद्द्यावरुन मारहाणीमुळे उत्तर भारतीय मतं दुरावण्याची भीती

भोंग्याविरोधातील भूमिकेमुळे अल्पसंख्याक मतं दुरावण्याची शक्यता

2019 मध्ये पवारांच्या पुढाकारानं सत्तेसाठी विरुद्ध विचारधारेचे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले होते.. या तीन्ही पक्षांनी अडीच वर्षे यशस्वी सरकार चालवून दाखवलं... त्यामुळे पवारांकडून राज ठाकरेंसाठी मध्यस्थीच्या हालचाली सुरु असल्याने काँग्रेस हायकमांड या नव्या समीकरणासाठी हिरवा झेंडा दाखवणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय... मात्र राज ठाकरेंसह महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढल्यास भाजपसमोर तगडं आव्हान उभं राहू शकतं, हे मात्र निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com