DCC तील राजकारणावरुन शंभूराज देसाई नाराज; NCP ला दिला इशारा

shambhuraj desai
shambhuraj desai
Published On

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस हाेता. बुधवारी नाट्यमय घडामाेडीनंतर खासदार उदयनराजे भाेसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्यासह ९ जण बिनविराेध निवडून गेले. दरम्यान राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे युवा नेते सत्यजीत पाटणकर यांच्यात काेणीच उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने त्या दाेघांत निवडणुक हाेणार असल्याचे स्पष्ट झाले. याविषयी आज (गुरवार) मंत्री शंभूराज देसाई यांना छेडले असता त्यांनी सेनेला देखील मार्ग माेकळे असल्याचे म्हटले. shambhuraj desai satara dcc bank election 2021 shivsena ncp

एका स्थानिक वृत्त वाहिनीशी बाेलताना ते म्हणाले सर्वसमावेशक पॅनलमध्ये मला डावलण्याचा हा विषय नाही. जसं महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आहे तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे प्रतिबंब दिसावे अशी शिवसेनेने मागणी केली हाेती. तसे संकेत राज्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले हाेते. एेनवेळी काय झाले आम्हांला माहित नाही. त्यामुळे यापुढं शिवसेनेला स्वतंत्र भुमिका घ्यावी लागेल. ती आम्ही घेऊ असे देसाईंनी नमूद केले.

shambhuraj desai
DCC त उदयनराजे सुटले; सहकारमंत्र्यांपुढे उंडाळकरांचे आव्हान

ते म्हणाले आपले बहुमत आहे. आपल्याबराेबरच जास्त मतदार आहेत. त्यामुळे असा एकतर्फा निर्णय जर काेणता पक्ष घेणार असेल तर आम्हांला देखील आमचे मार्ग माेकळे आहेत. आगामी काळातील सर्व निवडणुका शिवसेना स्वतंत्र पद्धतीने लढेल त्याबाबतचे धाेरण ठरविले जाईल असे शंभूराज देसाईंनी नमूद केले.

जिल्हा बॅंकेची आता निवडणुक हाेईल. ती निमित्त आहे. जिंकण्यासाठी शिवसेना लढेल. परंतु या पुढं शिवसेना निश्चित धाेरण ठरवत वाटचाल करील असे शंभूराज देसाईंनी स्पष्ट केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com