Shahapur : आमदार- खासदार विरोधात आक्रोश; ग्रामसभेत ग्रामस्थांनी दर्शविली नाराजी

Shahapur News : मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आमदार, खासदार जनतेचे प्रश्न मांडून सोडवत असतात. मात्र बऱ्याच मतदार संघात निवडून आल्यानंतर जनतेच्या समस्या ऐकून घेण्यासाठी लोकप्रतिनिधी मतदारसंघात फिरकत नाहीत
Shahapur News
Shahapur NewsSaam tv
Published On

फैय्याज शेख 
शहापूर
: शहापूर तालुक्यात अनेक समस्या आहेत. मात्र या समस्यांकडे लक्ष देण्यास आमदार, खासदार तयार नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरत आहे. याचेच एक उदाहरण समोर आले आहे. कसारा मोखावणे येथे नुकतीच पार पडलीलेल्या ग्राम भेत ग्रामस्थांनी नाराजगी दर्शविली आहे.

मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आमदार, खासदार जनतेचे प्रश्न मांडून सोडवत असतात. मात्र बऱ्याच मतदार संघात निवडून आल्यानंतर जनतेच्या समस्या ऐकून घेण्यासाठी लोकप्रतिनिधी मतदारसंघात फिरकत नाहीत. यामुळे जनतेमध्ये नाराजी पसरत असते. अशाच प्रकारे शहापूर तालुक्यात लोकप्रतिनिधींविरोधात नाराजी पसरली आहे. त्याचे पडसाद देखील ग्रामसभेत उमटल्याचे पाहण्यास मिळत आहेत. 

Shahapur News
Crime News : तिकीट एजंट बनला विदेशी स्कॉचचा तस्कर; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, तिघेजण ताब्यात

ग्रामसभेत मांडली नाराजी 

शहापूर तालुक्यातील कसारा मोखावणे येथे ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेला ग्रामपंचायत हद्दीतील बहुतांश ग्रामस्थ उपस्थित होते. मात्र या ग्रामसभेत ग्रामस्थांकडून एकच सुर निघाले ते म्हणजे आमदार, खासदार यांच्या विरोधात मतदान झाल्यापासून या भागात आमदार व खासदार यांनी ढुंकून देखील बघीतले नाही. यामुळे जनतेने प्रश्न कोणाकडे मांडायचे असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. 

Shahapur News
Ashadhi Wari : पंढरपूरच्या आषाढी वारीवर कोरोनाचे सावट; माळशिरस तालुक्यात कोरोनाची एंट्री

मग समस्या सुटणार कशा? 

शहापूर तालुक्यात अनेक समस्यांना लोकांना सामोरे जावे लागत आहे. पाणी, आरोग्य, रस्ते असे एक नाही; तर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र याकडे लक्ष देण्यासाठी आमदार किंवा खासदार यांना वेळ नाही. म्हणून नुकतीच कसारा मोखावणे येथे पार पडलेल्या ग्रामसभेत भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे व शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांच्या विरोधात आक्रोश दर्शवित ग्रामसभा पार पडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com