Amravati: अमरावती शाईफेक प्रकरणी 11 जणांवर तसेच रवी राणांसह कार्यकर्त्यांवर सुद्धा गुन्हा दाखल...(पहा व्हिडिओ)

अमरावती महापालिका आयुक्तांवर काल झालेल्या शाईफेक प्रकरणामध्ये आमदार रवी राणांवर गुन्हा दाखल करण्यात आला
Amravati: अमरावती शाईफेक प्रकरणी 11 जणांवर तसेच रवी राणांसह कार्यकर्त्यांवर सुद्धा गुन्हा दाखल...(पहा व्हिडिओ)
Amravati: अमरावती शाईफेक प्रकरणी 11 जणांवर तसेच रवी राणांसह कार्यकर्त्यांवर सुद्धा गुन्हा दाखल...(पहा व्हिडिओ)Saam Tv
Published On

अमरावती: अमरावती महापालिका (Municipal Corporation) आयुक्तांवर (commissioner) काल झालेल्या शाईफेक प्रकरणामध्ये आमदार (mla) रवी राणांवर (ravi rana) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवी राणा आणि इतर ११ आरोपींवर कलम ३०७ अंतर्गत हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप (Allegations) ठेवण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये पोलीसांनी (police) आत्तापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आले आहे. राजापेठ उड्डाणपुलावर अनधिकृत पुतळा हटवल्यामुळे आयुक्तांवर काल शाईफेक करण्यात आली होती. या प्रकरणामध्ये युवा स्वाभिमान पक्षाच्या ५ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केले आहे. (shafeek case against amravati municipal commissioner crime against 11 persons including mla ravi rana)

पहा व्हिडिओ-

या हल्ल्याच्या निषेधार्थ आज अग्निशमन दल वगळता सर्व कार्यालयांमध्ये कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. राजपत्रित संघ आणि नगरपालिका प्रशासन, महसूल विभाग हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. अमरावतीच्या महापालिका आयुक्तांवर काल झालेल्या शाईफेकीच्या विरोधामध्ये आज अग्निशमन दल वगळता सर्व कार्यालयांमध्ये कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. नगरपालिका प्रशासन, महसूल विभाग हे या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत.

राजापेठ उड्डाणपुलावर अनधिकृत पुतळा हटवल्याने आयुक्तांवर काल शाईफेक करण्यात आली होती. आयुक्तांवर शाईफेक करणाऱ्या ७ जणांपैकी ५ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भारतीय दंडसहीता कलम ३०७ म्हणजेच प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये ५ ही आरोपी युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते असल्याचे कळत आहे. राजापेठ उड्डाण पुलावर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणामध्ये महिलांनी संताप व्यक्त केल्याचे दिसून आले आहे.

Amravati: अमरावती शाईफेक प्रकरणी 11 जणांवर तसेच रवी राणांसह कार्यकर्त्यांवर सुद्धा गुन्हा दाखल...(पहा व्हिडिओ)
Beed: वडझरी पॅटर्नचा आणखी एका मोहरक्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

काल दुपारी मनपा आयुक्त आष्टीकर हे त्यांच्या अंगरक्षक पोलीस कर्मचारी आणि मनपा अधिकारीबरोबर उड्डाणपुलाखाली दाखल झाले होते. तेवढ्यामध्येच २ महिला आणि काही शिवप्रेमी दाखल होऊन काही वेळामध्येच मनपा आयुक्त आष्टीकर यांना पकडून त्यांच्या अंगावर काळी शाई फेकली होती. या झटापटीतून आष्टीकर यांनी पळण्याचा प्रयत्न ही केला होता. मात्र पुन्हा त्यांचा पाठलाग करून त्यांची कॉलर पकडून २ महिलांनी शाई फेकून त्यांच्या विरोधात घोषणा देऊन तेथून पळ काढला आहे.

मनपा आयुक्त आष्टीकर यांच्या अंगरक्षक पोलीस कर्मचाऱ्याने धाव घेऊन त्यांना वाहनापर्यंत नेण्यात आले आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच महानगरपालिका मधील कर्मचारी- अधिकारी चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी कामबंद करून मनपा समोर येऊन आंदोलन सुरू केले. या घटनेचा मात्र संपूर्ण जिल्ह्यात निषेध केला जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com