अल्पवयीन मुलीची बलात्कार करुन हत्या; प्राथमिक संशय प्रियकरावर

सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
अल्पवयीन मुलीची बलात्कार करुन हत्या; प्राथमिक संशय प्रियकरावर
अल्पवयीन मुलीची बलात्कार करुन हत्या; प्राथमिक संशय प्रियकरावरSaam TV

पिलीभीत: उत्तर प्रदेश मधील पिलीभीतमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. पिलीभीतमध्ये 12वीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा नग्नअवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, अटक केलेला तरुण मृत तरुणीचा प्रियकर असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

अल्पवयीन मुलीची बलात्कार करुन हत्या; प्राथमिक संशय प्रियकरावर
बीडमध्ये 15 लाखांचे सोयाबीन पळवणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या

नेमकं काय घडलं ?

उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये 12वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कारानंतर हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 13 नोव्हेंबर रोजी मुलगी कॉलेजसाठी निघाली होती, पण ती संध्याकाळपर्यंत घरी आलीच नाही. यानंतर तिचा शोध घेतला असता, एका उसाच्या शेतात तिचा मृतदेह आढळून आला. आरोपींनी शेतात नेऊन मुलीच्या तोंडात कपडा कोंबला आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसेच, घटना लपवण्यासाठी बलात्कारानंतर मुलीचा गळा आवळून खून करण्यात आला. शनिवारी रात्री उशिरा मृतदेह घरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावर असलेल्या शेतात आढळून आला आहे. याप्रकरणी मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.

दोनपेक्षा जास्त आरोपी

मुलीच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. तसेच, शरीराच्या आजूबाजूला रक्तही सांडलेले दिसत आहे. यावरुन तिच्यावर झालेला अत्याचार किती क्रुर होता हे जाणवत आहे. तर, मृतदेहापासून काही अंतरावर तिच्या वह्या, पिशवी, सायकल आणि बूट सापडले आहेत. याशिवाय पोलिसांना घटनास्थळी 4 बिअरच्या बाटल्या आणि सिगारेटचे तुकडे सापडले आहेत. आरोपींची संख्या दोनपेक्षा जास्त असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com