बीडमध्ये 15 लाखांचे सोयाबीन पळवणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या

एका फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या शेतकरी व्यापाऱ्याने, शेतकऱ्यांकडून घेतलेलं सोयाबीन, एका ट्रकमध्ये भरलं होतं. ते धुळे या ठिकाणी विक्रीसाठी घेऊन जायचं होतं.
बीडमध्ये 15 लाखांचे सोयाबीन पळवणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या
बीडमध्ये 15 लाखांचे सोयाबीन पळवणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्याSaam TV

बीडच्या: चौसाळा गावातून 15 लाखाचे सोयाबीन घेऊन पसार झालेल्या ट्रक चालक मालकाच्या, बीडच्या नेकनूर पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या आहेत. परळी तालुक्यातून त्याला अटक केली आहे. अतिवृष्टीग्रस्त बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना फसवण्याचा आणि शेतकऱ्यांचे धान्य चोरून नेण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. असाच काहीसा प्रकार बीडच्या चौसाळा गावांमध्ये घडला होता. एका फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या शेतकरी व्यापाऱ्याने, शेतकऱ्यांकडून घेतलेलं सोयाबीन, एका ट्रकमध्ये भरलं होतं. ते धुळे या ठिकाणी विक्रीसाठी घेऊन जायचं होतं.

मात्र या शेतकरी व्यापाऱ्याला चकवा देऊन, ट्रक मालक चालक सोयाबीनने भरलेली ट्रक घेऊन त्या ठिकाणाहून पसार झाला होता. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात अंगद नाईकवाडे यांच्या फिर्यादीवरून कलम ४२०, ४०६ भादंवी नुसार गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान आठ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर, नेकनूर पोलिसांनी अखेर फसवणूक करणाऱ्या आख्तर रशीद शेख याला, परळी तालुक्यातील धर्मापुरी येथून ताब्यात घेतलं असून 15 लाखांची सोयाबीन देखील पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com