धक्कादायक |लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवरती लैंगिक अत्याचार; फोटो व्हायरल करून केली बदनामी

अनिल धुमाळ वरती बलात्कारासह अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धक्कादायक |लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवरती लैंगिक अत्याचार; नग्न फोटो व्हायरल करून केली बदनामी
धक्कादायक |लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवरती लैंगिक अत्याचार; नग्न फोटो व्हायरल करून केली बदनामी लक्ष्मण सोळुंके

जालना : सोशल मीडियावर (Social Media) ऑनलाइन ओळख झालेल्या वीस वर्षीय हेंद्राराबाद (Hyderabad) येथील तरुणीवर परतूर मध्ये मोबाईल शॉप (Mobile shop) चालवणाऱ्या मित्रांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sexual abuse of young women in Hyderbad)

हे देखील पहा-

हैद्राबाबद येथील कंपनीत काम करणाऱ्या तरुणीची परतूर शहरात मोबाईल शॉपी व्यावसायिक अनिल धुमाळ (Anil Dhumal) याच्याशी ऑनलाइन ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर घट्ट मैत्रीत झाल्याने नेहमी फोनच्या माध्यमातून ते संपर्कांत होते आणि त्यातूनच त्यांची जवळीक वाढत गेली. जुलै महिन्यात अनिल चा वाढदिवस असल्याने या तरुणीला वाढदिवसाला (Birthday) बोलावून तुझ्याशी लग्न करतो म्हणून असे आमिष दाखवून शरीर संबंध ठेवले नंतर काही दिवसांनी तरुणीने लग्नासंबंधी विचारले असता अनिलने उडवाउडवीचे उत्तरे देऊन लग्नास नकार दिला. तो एवढ्यावरच न थांबता त्याने तरुणीचे नग्न अवस्थेतत काढलेले फोटो नातेवाईकांना पाठवून व्हायरल करून बदनामीही केली.

धक्कादायक |लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवरती लैंगिक अत्याचार; नग्न फोटो व्हायरल करून केली बदनामी
प्रियकराच्या मदतीने केला चिमुरड्याचा खून; आईच्या नात्याला काळीमा लावणारी घटना!

या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादी वरुण लग्नाचे आमिष दाखवून नग्न फोटो व्हायरल करून धमकी देत शारीरिक सबंध स्थापन केल्या प्रकरणी अनिल रामराव धुमाळ रा.शेवगा ता. परतूर यांच्या विरुद्ध बलात्कारा सह अट्रोसिटीचा (Atrocity) गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी ला अटक करण्यात आले आहे, या प्रकरणी अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी करीत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com