Raigad: बूस्टर डोससाठी जेष्ठ नागरिक बसले तीन तास ताटकळत; प्रशासनाचा सावळा गोंधळ

साडे अकरा वाजता सुरू झाली डोस प्रक्रिया
Booster Dose Vaccination In Raigad
Booster Dose Vaccination In Raigadराजेश भोस्तेकर
Published On

राजेश भोस्तेकर

रायगड : जेष्ठ नागरिक, फ्रंट लाईन वर्कर, हेल्थ वर्कर यांच्यासाठी तिसरा बूस्टर डोस (Booster Shot) लसीकरण आज 10 जानेवारीपासून सुरू करण्यात आले आहे. मात्र अलिबागमध्ये (Alibaug) जेष्ठ नागरिकांसाठी नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यात हयगय झाल्याने सकाळपासून आलेल्या जेष्ठ नागरिकांना तीन तास ताटकळत राहावे लागले. अलिबाग शहरातील सावित्री पर्ल इमारतीत फ्लॅटमध्ये स्वच्छता केल्यानंतर साडे अकरा वाजता लसीकरण सुरू करण्यात आले.

रायगड (Raigad) जिल्ह्यातही आजपासून जेष्ठ नागरिक, फ्रंट लाईन वर्कर, हेल्थ वर्कर याचे लसीकरण सुरू झाले आहे. अलिबागमधील डोंगरे हॉल येथे ज्यांना तिसऱ्या डोस साठी मेसेज आले होते असे जेष्ठ नागरिक नऊ वाजल्यापासून तिसरा बूस्टर डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर दाखल झाले होते. (Raigad vaccination news in marathi)

Booster Dose Vaccination In Raigad
Covid Cases in Supreme Court: SCमध्ये कोरोनाचा कहर; 7 न्यायाधीश, 250 कर्मचाऱ्यांना लागण

मात्र, डोंगरे हॉल येथे याबाबत कोणतीच माहिती कर्मचाऱ्यांना नसल्याने गोंधळ उडाला होता. अखेर शहरातील ब्राम्हण आळी येथील सावित्री पर्ल इमारतीत लसीकरण केले जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर जेष्ठ नागरिक हे त्याठिकाणी दाखल झाले. मात्र लसीकरण केंद्राची स्वच्छता होईपर्यत या जेष्ठ नागरिकांना काही काळ वाट पाहावी लागली. त्यानंतर जेष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरळीत सुरू झाले.

हे देखील पहा-

जिल्ह्यात आज 1 हजार 147 जेष्ठ नागरिक, 6 हजार 153 फ्रंट लाईन तर 7 हजार 353 हेल्थ वर्कर यांचे लसीकरण होणार आहे. मात्र पहिल्याच दिवशी बूस्टर डोस लसीकरण मोहिमेत प्रशासनाचा सावळा गोंधळ झालेला पाहायला मिळाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com