सभापतिपदासाठी शिवसेना-काँग्रेसमध्ये रस्सीखेच

अहमदनगर महापालिका
अहमदनगर महापालिका
Published On

अहमदनगर ः राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग नगर महापालिकेतही राबविण्यात आला आहे. पहिल्या अडीच वर्षांच्या कालावधीत भारतीय जनता पक्षाचा महापौर होता. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या पाठबळाने ही महापालिका भाजपने ताब्यात घेतली होती. त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नाराजी आमदार संग्राम जगताप यांना ओढवून घ्यावी लागली होती. परंतु नंतरच्या अडीच वर्षांच्या काळात महाविकास आघाडीतील नेत्यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली.

सत्तेच्या नवीन सूत्रानुसार शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांना महापौरपद देण्यात आले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश भोसले यांची उपमहापौरपदी निवड झाली. स्थायी समितीवरही राष्ट्रवादीने कब्जा केली आहे. सत्तेच्या या वाटपात काँग्रेसला काहीच स्थान नसल्याने त्यांनी महिला व बालकल्याण समिती सभापतिपदाची मागणी केली आहे.

अहमदनगर महापालिका
यंदा उडीद पेरला असता तर... बघा, कसला भारी भाव मिळतोय!

काँग्रेसतर्फे रूपाली निखील वारे यांची या पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यांच्याच वॉर्डमधील संध्या पवार याही इच्छुक आहेत.

नगर महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या १६ सदस्यांची आज निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे ६, शिवसेना ५, भाजप ४, काँग्रेस आणि बसपच्या प्रत्येकी एका सदस्याची निवड करण्यात आली. सभापतीपदासाठी काँग्रेस आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे.

यांची झाली निवड

राष्ट्रवादी - मीना चोपडा, मीना चव्हाण, दीपाली बारस्कर, परवीन कुरेशी, शोभा बोरकर. शिवसेना - कमल सप्रे, पुष्पा बोरूडे, सुरेखा कदम, सुवर्णा गेनप्पा, शांताबाई शिंदे. भाजप - वंदना ताठे, सोनाली चितळे, आशा कराळे, पल्लवी जाधव. काँग्रेस - सुप्रिया जाधव, बसप - अनिता पंजाबी.

महासभा ताटकळली

बसपमुळे महासभेला ताटकळत रहावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेसच्या सदस्यांची महासभेत नियुक्ती करण्यात आली. मात्र बसपच्या सदस्यांचे पत्र त्यांच्या गटनेत्याने दिले नव्हते. त्यामुळे पत्रासाठी त्यांच्याकडे विचारणा करण्यात आली. त्यानंतर गटनेते मुदस्सर शेख यांनी शिफारस पत्र दिले. त्यानंतर बसपच्या सदस्य म्हणून अनिता पंजाबी यांची नियुक्ती करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com