दिवेआगर श्री सुवर्ण गणेशाची सुरक्षा हायटेक! १६ CCTV, अलार्म सिस्टम, २४ तास पोलिस

24 मार्च 2012 साली दिवेआगर श्री सुवर्ण गणेश मंदिरावर दरोडा टाकून सोन्याची मूर्ती चोरट्यांनी पळवली होती. याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सुरक्षा हायटेक केली आहे.
दिवेआगर श्री सुवर्ण गणेशाची सुरक्षा हायटेक! १६ CCTV, अलार्म सिस्टम, २४ तास पोलिस
दिवेआगर श्री सुवर्ण गणेशाची सुरक्षा हायटेक! १६ CCTV, अलार्म सिस्टम, २४ तास पोलिसराजेश भोस्तेकर
Published On

राजेश भोस्तेकर, रायगड

रायगड: नऊ वर्षानंतर दिवेआगर श्री सुवर्ण गणेशाची (Diveagar Shree Suvarna Ganesh Temple) पुनर्स्थापना 23 नोव्हेंबर रोजी अंगारकी संकष्टी दिनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने करण्यात आली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते गणरायाची पुनर्स्थापना करण्यात आली. पुन्हा सुवर्ण गणेशाची चोरी होऊ नये यासाठी आता हायटेक सुरक्षा यंत्रणा कार्यन्वित (Hi-Tech Security) करण्यात आली आहे. (Security of Diveagar Shri Suvarna Ganesha Hi-Tech! 16 CCTV, alarm system, 24 hour police)

हे देखील पहा -

16 सीसीटीव्ही, मजबूत तिजोरी, एक किलोमीटर परिसरात अलार्म आणि मेसेज यंत्रणा बसविण्यात आली आहे. मंदिर आवारात 24 तास शस्त्रधारी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे श्री सुवर्ण गणेश आता हायटेक सुरक्षा यंत्रणेत विराजमान झाले आहेत. 24 मार्च 2012 साली दिवेआगर श्री सुवर्ण गणेशाच्या मंदिरावर दरोडा टाकून सोन्याची मूर्ती चोरट्यांनी पळवली होती. या घटनेत दोन सुरक्षा रक्षकांचा नाहक बळी गेला होता. शासनाने पोलीस यंत्रणा सतर्क करून या चोरट्याना जेरबंद केले. त्यानंतर त्यांना शिक्षाही झाली. मात्र सोन्याची मूर्ती वितळविली असल्याने पुन्हा तशीच मूर्ती बनविण्यासाठी पालकमंत्री अदिती तटकरे, (Aditi Tadkare) खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी प्रयत्न केले. त्यानंतर न्यायालयीन सोपस्कार करून प्रसिद्ध सुवर्णकार पु. ना. गाडगीळ यांच्याकडून मूर्ती तयार करण्यात आली. 23 नोव्हेंबर रोजी श्री सुवर्ण गणेशाची अंगारकी संकष्टीला पुनर्स्थापना केली.

श्री सुवर्ण गणेशाची पुन्हा चोरी होऊ नये यासाठी न्यायालय आणि प्रशासनामार्फत कडक सुरक्षा यंत्रणा कार्यन्वित करण्याचे निर्देश मंदिर प्रशासनाला देण्यात आले होते. त्यानुसार मंदिर आणि परिसरात 16 सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. श्री सुवर्ण गणेश मूर्ती ही गोदरेज कंपनीच्या तिजोरीत सुरक्षित ठेवण्यात आली आहे. तिजोरील अलार्म यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे कोणी स्पर्श केल्यास त्वरित अलार्म वाजून 1 किलोमीटर परिसरात आवाज होणार आहे. त्याचबरोबर विश्वस्त, पोलीस यांना मेसेज जाणार आहेत.

दिवेआगर श्री सुवर्ण गणेशाची सुरक्षा हायटेक! १६ CCTV, अलार्म सिस्टम, २४ तास पोलिस
न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी विरुद्ध अटक वॉरंट

मंदिराचे दरवाजे, खिडक्या यांना सेन्सर लावण्यात आले आहेत. मंदिराच्या बाजूला भिंत बांधण्यात आली असून जाळीही लावण्यात येणार आहे. मंदिर आवारात 24 तासात तैनात पोलीस चौकीसह पोलीस तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे श्री सुवर्ण गणेशाची हायटेक सुरक्षा यंत्रणा कार्यन्वित करण्यात आली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com