मुंबई - मुंबई महापालिकेने (BMC) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना दुसऱ्यांदा नोटीस बजावली आहे. महापालिकेच्या के वेस्ट विभागाकडून नारायण राणेंच्या आधिश बंगल्याला दुसरी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या बंगल्यावर महापालिकेचा हातोडा पडणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
१५ दिवसांत स्वत:हून अतिरीक्त अनधिकृत बांधकाम निष्कासीत करा नाहीतर पालिकेला कारवाई करावी लागेल अशी नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, पहिल्या नोटीसीनंतर दुसऱ्या नोटीसीतही १५ दिवसांचेच अल्टीमेटम दिल्यानं पालिकेच्या भूमीकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष दौंडकर महापालिका आयुक्तांना राणे बंगला कारवाईप्रकरणी वकिलामार्फत लिगल नोटीस पाठवणार आहे.
दरम्यान, याआधी १८ फेब्रुवारी रोजी मुंबई महानगरपालिकेच्या के पश्चिम विभागाच्या बिल्डिंग प्रपोजल विभागाच्या पथकाने नारायण राणे यांच्या अधिश बंगल्यात जाऊन तपासणी केली होती. नारायण राणेंच्या बंगल्याला वरच्या कारवाईची नोटीस काढुन वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी केला आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.