भंडारा जिल्ह्यात उद्यापासून शाळा लॉक !

कोरोना काळात मागील दीड वर्षापासून शाळेचे शुल्क पालकांकडून न आल्यामुळे तसेच सरकार कडून देखील निधी आला नसल्याने शाळा चालवणे कठीण झाल्याने तब्बल 94 खाजगी शाळा उद्यापासून बंद करण्याचा निर्णय शाळा संचालकांनी घेतला आहे.
भंडारा जिल्ह्यात उद्यापासून शाळा लॉक !
भंडारा जिल्ह्यात उद्यापासून शाळा लॉक !SaamTv
Published On

अभिजीत घोरमारे

भंडारा - भंडारा जिल्ह्यात उद्यापासून खाजगी शाळा बंद होणार आहेत. कोरोना काळात मागील दीड वर्षापासून शाळेचे शुल्क पालकांकडून न आल्यामुळे तसेच सरकार कडून देखील निधी आला नसल्याने शाळा चालवणे कठीण झाल्याने तब्बल 94 खाजगी शाळा उद्यापासून बंद करण्याचा निर्णय शाळा संचालकांनी घेतला आहे. Schools locked in Bhandara district from tomorrow!

यामुळे या शाळांमधील हजारो शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट ओढवणार असून हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

भंडारा जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात यामुळे मोठा भूकंप आला असून पालकांनी तब्बल 100 कोटीचे शाळा शुल्क थकविल्याने भंडारा जिल्ह्यात तब्बल 94 खाजगीशाळा उद्या पासून बंद होणार आहेत. आर्थिक नुकसानीपोटी भंडारा शहरातील "माइंड आय स्कूल" ही शाळा बंद झाली.

या शाळेनंतर आता जिल्ह्यातील तब्बल 94 शाळा 1 जुलै पासून पूर्ण पणे बंद करण्याच्या निर्णय शाळा संचालकांनी घेतला असून दीड वर्षापासून या 94 शाळांचे तब्बल 100 कोटी रुपये इतके शैक्षणिक शुल्क थकविल्याने तसेच आरटीआयचे शासनाने तब्बल 16 कोटी रुपये थकविल्याने शाळा चालवणे आता कठीण झाल्याने ह्या शाळा संचालकांनी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

भंडारा जिल्ह्यात उद्यापासून शाळा लॉक !
सोलापुरात गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर अज्ञात इसमाकडून दगडफेक

कोरोनाकाळात दीड वर्षापासुन शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन शिक्षण सुरु होते. मात्र पालक फी भरण्यास तयार नसल्याने शाळा चालवण्यासाठी मार्केट मधून व्याजाने घेतलेले पैसे भरावे कसे हा प्रश्न निर्माण झाल्याचे शाळा संचालकांकडून सांगण्यात येत आहे. कोरोना काळात 15 टक्के शुल्क माफ करून सुद्धा पालक तयार नसतील तर शाळा सुरु ठेवणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र यामुळे शाळांवर अवलंबून असणारे हजारो शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. या बाबत शाळा संचालकांनी शाळा बंद करण्याच्या निर्णयाचे निवेदन भंडारा जिल्हाधिकारी यांना दिले असून जिल्हाधिकाऱयांनी लवकर मध्यस्थी करून या समस्येवर उपाय काढणार असल्याचे सांगिलते आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com