Breaking: 17 ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरु होणार
Breaking: 17 ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरु होणार Saam Tv

Breaking: 17 ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरु होणार

ग्रामीण भागात पाचवी ते सातवी या वर्गांच्या शाळा सुरू करण्याचे शासन आदेश जारी करण्यात आले आहेत.
Published on

मुंबई: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट (Corona Third Wave) येणार असं तज्ञ व्यक्ती सांगत असतानाच राज्य सरकार (State Gorenment) देखील शाळा महाविद्यालय व बाजारपेठा याबाबत विचारपूर्वक पावले उचलत आहेत. काल सोमवारी मुंबई मध्ये राज्याचे टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासोबत बैठक झाली या बैठकीत टास्क फोर्स राज्यातील ऑगस्ट-सप्टेंबर व आक्टोबर या महिन्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

सोबतच शाळा महाविद्यालय सुरू न करण्याची शिफारस केली आहे तर दुसरीकडे 17 ऑगस्ट पासून शहरी भागातील महानगरपालिका व नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रांमध्ये इयत्ता आठवी ते बारावी या वर्गांच्या शाळा सुरू कराव्यात तर ग्रामीण भागात पाचवी ते सातवी या वर्गांच्या शाळा सुरू करण्याचे शासन आदेश जारी करण्यात आले आहेत.

Breaking: 17 ऑगस्टपासून राज्यातील शाळा सुरु होणार
''गंगाखेड नगरपालिकेत गटारी पार्टी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा''

यामुळे एकूणच टास्क फोर्स यांची शिफारस आणि शाळा महाविद्यालय सुरू करण्याचा शासनाचा निर्णय यात थोडासा विरोधाभास असल्याचा जाणकारांचं मत आहे. शाळा सुरू करण्याबाबत शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना यानुसार covid-19 चे नियम पाळत सहा फुटावर एक विद्यार्थी तर एका बाकावर एक विद्यार्थी बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जास्त विद्यार्थी संख्या असणाऱ्या मोठ्या शाळांना शासनाच्या या नियमानुसार वर्ग भरविणे कठीण आहे, तर शिक्षक व वर्गखोल्यांची संख्या याचा ताळमेळ कसा लावावा हा प्रश्न देखील मुख्याध्यापक व प्राचार्यसह संस्थाचालक व प्रशासनासमोर आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com