Schools Closed in Raigad
Schools Closed in Raigadराजेश भोस्तेकर

रायगडात आज शाळेची घंटा वाजली नाही; ऑनलाईनच शिक्षण सुरू

शासनाचे शाळा सुरू करण्याचे निर्देश मात्र, रायगडात प्रशासनाचे अद्याप आदेश जारी नाहीत.
Published on

राजेश भोस्तेकर

रायगड : राज्य शासनाने (State Government) आज 24 जानेवारी पासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले असले तरी रायगडात मात्र शाळेची घंटा वाजलीच नाही. जिल्हा प्रशासनाकडून कोणतेही आदेश शाळा सुरू करण्याबाबत जारी केले नसल्याने रायगडमधील (Raigad) शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत.

Schools Closed in Raigad
सावधान! फेसबुकवर तुमची एक कमेंट अन् तुम्हाला खावी लागू शकते जेलची हवा

शासनाचे आदेश शाळा सुरू (Schools Reopen) करण्याबाबत आले असले तरी जिल्हा प्रशासनाकडून कोणतेही आदेश जाहीर केले नसल्याने शाळा प्रशासन शाळा सुरू करण्याबाबत द्विधा मनस्थितीत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आदेश आल्यानंतरच शाळा सुरू करण्याचा निर्णय अनेक खाजगी शाळांनी घेतला आहे. एक दोन ठिकाणी जिल्ह्यात शाळा सुरू करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

रायगडमधील कोरोना स्थिती;

रायगडात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव हा वाढत असून रोज हजारच्या संख्येने रुग्ण बाधित होत आहेत. असे असले तरी कोरोना बाधित रुग्ण हे घरीच उपाचार घेत आहेत. सध्या जिल्ह्याची रुग्णसंख्या बारा हजारावर पोहचली आहे. शासनाने शाळा सुरू करण्याबाबत आदेश जारी केले असले तरी जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती पाहून अद्याप शाळा सुरू करण्याबाबत कोणतेही आदेश प्रशासनाने जारी केलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यात आज 24 जानेवारी रोजी शाळेची घंटा वाजली नसल्याने ऑनलाईन वर्ग (Online Learning) अद्यापही सुरूच आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com